शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

India China Standoff : आता चीनला रोखणार हा 'अजेय योद्धा', लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 18:11 IST

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हवाई दल अलर्टवर आहे.

ठळक मुद्दे 27 जुलैपर्यंत सहा फायटर जेटची पहिली खेप भारताला मिळू शकते.फ्रान्ससोबत झालेल्या राफेल खरेदी करारांतर्गत भारताला एकूण 36 राफेल जेट मिळणार आहेत.पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हवाई दल अलर्टवर आहे.

नवी दिल्ली -भारत-चीन तणाव दिवसागणीक वाढतच चालला आहे. असे असतानाही दोन्ही देश शांततेसाठीही प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या चर्चेचा काहीही परिणाम स्पष्टपणे येताना दिसत नाही. आता भारताला कुठल्याही आघाडीवर मागे रेटने अशक्य आहे, हे चीनने जाणले आहे. आता भारताच्या शस्त्रागारात सर्वात मोठे शस्त्र आणि अजेय वायू योद्धा अशी ओळख असेले राफेल फाइटर जेट सामील होत आहे. 27 जुलैपर्यंत सहा फायटर जेटची पहिली खेप भारताला मिळू शकते.

36 राफेल जेटचा सौदा -फ्रान्ससोबत झालेल्या राफेल खरेदी करारांतर्गत भारताला एकूण 36 राफेल जेट मिळणार आहेत. याची पहिली खेप 27 जुलैला भारताला मिळणार आहे. योजनेनुसार पूर्वी 4 राफेल लढाऊ विमानं अंबाला येथे पोहोचणार होती मात्र, आता याहून अधिक विमानं फ्रान्स पाठवणार आहे. यानुसार, 8 विमानांचे सर्टिफिकेशन मिळणार आहे.

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

हवाई दल अलर्टवर -पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हवाई दल अलर्टवर आहे. 2 जूनला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री  फ्लोरेन्स पॅली यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. यावेळी, कोरोना व्हायरस महामारी असली तरी,  राफेल जेट ठरलेल्या वेळेच्या आत भातात पोहोचतील, असे पॅली यांनी म्हटले होते.

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

हवाई दलाची क्षमता वाढेल -लष्करातील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, की राफेल जेट्सच्या येण्याने भारतीय हवाई दलाची तागद प्रचंड वाढेल. हवाई दलाचा पहिला ताफा अंबाला हवाई दलाच्या स्टेशनवर तैनात केला जाईल. हवाई दलाच्या रणनीतीच्या दृष्टीने हेदेखील एक महत्वाचे ठिकाण आहे.

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

36 राफेल जेट विमानांपैकी 30 फायटर जेट असतील तर सहा ट्रेनर असतील. ट्रेनर जेट ट्विन-सीटर असतील आणि त्यांच्यात फायटर जेट्ससारखीच सर्व व्यवस्था असेल. विमानाचे दर आणि कथित भ्रष्टाचारासह या सौद्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, सरकारने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. 

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनladakhलडाखFranceफ्रान्सRafale Dealराफेल डील