शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

'मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का?' एस जयशंकर यांनी चीनला सुनावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 7:08 PM

Arunachal Pradesh Row: अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणाऱ्या चीनला जयशंकर यांनी कडक शब्दात सुनावले.

S Jaishankar reply to China:भारताचा शेजारील देश चीन सतत ईशान्येकडील अरुणालच प्रदेशावर आपला दावा सांगतो. यावरुन अनेकदा भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. दरम्यान, आता केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनला कडक शब्दात सुनावले. सोमवारी (1 एप्रिल) मीडियाशी बोलताना जयशंकर म्हणतात, "मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे. नाव बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य एलएसीवर तैनात आहे. ते त्यांचे काम योग्यरित्या करतील."

दरम्यान, सोमवारीच चीनने भारतातील विविध ठिकाणांच्या 30 नवीन नावांची चौथी यादी जाहीर केली आहे. यानंतर जयशंकर यांची ही प्रतिक्रिया समोर आली. कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी परराष्ट्रमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी चीनला आरसा दाखवला. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे भारताने खंडन केले. 

चीनने अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हटले चीनी सरकारी मीडिया 'ग्लोबल टाईम्स' नुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने 'जंगनान'मधील भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. चीन अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हणतो आणि राज्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदेशासाठी 30 नावे देखील पोस्ट करण्यात आली आहेत. ही यादी 1 मे पासून लागू होणार आहे. तिथल्या मंत्रालयाने यापूर्वी 2017 मध्ये "जंगनान" मधील सहा ठिकाणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली, तर 2021 मध्ये 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2023 मध्येही 11 ठिकाणांच्या नावांसह तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

अरुणाचल प्रदेशवर अमेरिकेची प्रतिक्रियाअरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे म्हणत अमेरिकेने यापूर्वीच चीनवर टीका केली होती. तसेच, एलएसीवर सीमा वाढविण्याच्या दिशेने उचललेल्या चीनच्या पावलांचा निषेधही केला होत. 

 

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाIndiaभारत