शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: आता चीनची नवी घुसखोरी; गलवान खोऱ्यातही ठोकले तंबू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 06:24 IST

भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या दौलत बेग औल्डी येथील धावपट्टीच्या सुमारे ३० किमी आग्नेयेस वाय जंक्सन वा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणापर्यंत चीनने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने आणि खास लष्करी उपकरणेही आणली आहेत.

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोरे, हॉटस्प्रिंग व पॅनगाँग त्सो सरोवर या ठिकाणांवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनच्या सैन्याने उत्तरेकडील डेपसांग पठारावर घुसखोरी सुरू केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा स्वत:च्या बाजूला खेचण्याचा चीनचा हा प्रयत्न आहे. ज्या गलवान खोºयात भारताच्या २० जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले, तिथेही चीनने नवे बांधकाम सुरू केले आहे. सैन्यमाघारीची सहमती झाली असे सांगणारे चीन प्रत्यक्षात तिथे पाय घट्ट रोवण्याच्या तयारीत दिसत आहे. भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या दौलत बेग औल्डी येथील धावपट्टीच्या सुमारे ३० किमी आग्नेयेस वाय जंक्सन वा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणापर्यंत चीनने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने आणि खास लष्करी उपकरणेही आणली आहेत.लष्कराच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्याने ‘अशा वृत्तास आम्ही दुजोरोही देणार नाही किंवा त्याचा इन्कारही करणार नाही,’ असे सांगितले.तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी ब्रँड व उत्पादनांसाठी भारतीय बाजारांमध्ये आणखी अडचणी निर्माण होत आहेत.>दावा भारताने फेटाळलागलवान खोºयावर चीनने केलेला दावा भारताने पुन्हा ठामपणे फेटाळून लावला आणि दोन्ही देशांमध्ये झालेल्या सर्व करारांचे उल्लंघन करत चीनने मे महिन्यापासूनच सैन्य व युद्धसामुग्रीची मोठी जमवाजमव सुरु केल्यानेच गलवान खोºयातील संघर्ष घडला, अशी टीका केली. परराष्ट्र प्रवक्ते म्हणाले की, गलवान खोरे भारताचेच आहे व भारतीय सैन्य फार पूर्वीपासून तेथे आहे. सीमेवरील जी ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा भारताने कधीही प्रयत्न केलेला नाही. चीनने मात्र तसे कधीही केलेले नाही.30 किमी आग्नेयेस वाय जंक्शन किंवा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणाºया ठिकाणापर्यंत चीनने मुसंडी मारली आहे. तेथे चीनने मोठ्या संख्येने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने व लष्करी उपकरणेही आणली आहेत.>जवानांच्या कार्यावर मर्यादा‘बॉटलनेक’ हे ठिकाण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून भारताच्या बाजूला १८ किमीवर आहे. तेथून लडाखमधील बुर्टसे हे गाव सात किमी ईशान्येस आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा याहूनही पाच किमी पश्चिमेस आहे, असा चीनचा दावा आहे.या ठिकाणाला ‘वाय जंक्शन’ म्हणतात. तेथून एक फाटा राखी नाल्याच्या बाजूने उत्तरेला ‘पॅट्रोलिंग पॉईंट १०’पर्यंत जातो,तर दुसरा आग्नेयेस ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट१३’पर्यंत जातो. या १०, ११, ११ए, १२ व १३ या ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट’वर गस्त घालण्यासाठी भारतीय सैन्याची गस्ती तुकड्या याच पायवाटांचा वापर करतात.या १० ते १३ ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट’पर्यंत चीनचा वावर सुरु झाला तर दौलत बेग ओल्डी धावपट्टी परिसरात गस्त घालण्याच्या भारतीय सैन्याच्या कार्यावर मर्यादा येऊ शकतील.वाहनांचा रस्ता फक्त ‘बॉटलनेक’पर्यंतच जातो. एप्रिल २०१३ मध्येही चीनने या डेपसांग पठारावर तंबू ठोकले होते.त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये तीन आठवडे तणातणी सुरु होती.अखेर राजनैतिक पातळीवर वाटाघाटी होऊन स्थिती पूर्वपदावर आली होती.>गलवान खोºयात चीनकडून सुरु असलेल्या नव्या बांधकामाची चित्रे अमेरिकेतील कंपनीने उपलब्ध केली असून, त्यांचा अन्वयार्थ आॅस्ट्रेलियातील सामरिक तज्ज्ञ नॅथन रुजर यांनी लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गलवान नदीकाठच्या उंच कपारीच्या पायथ्याशी चीनने दोन ताजी बांधकामे केल्याचे दिसते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत