शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:52 PM

India China Faceoff : राजकीय नेत्यांकडूनही भारतीय जवान शहीद झाल्यानं चीनचा बदला घेण्याची भाषा बोलली जात आहे.

नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखजवळच्या LACवरून वाद सुरू आहे. चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान आज शहीद झाले. त्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन सेना प्रमुखांची बैठक घेतली. आता राजकीय नेत्यांकडूनही भारतीय जवान शहीद झाल्यानं चीनचा बदला घेण्याची भाषा बोलली जात आहे.लडाखच्या गलवानमध्ये चीनबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या ३ योद्ध्यांबरोबर भारत उभा आहे. एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये, या हत्येचा सूड घेतला जावा, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे. दुसरीकडे सतत असे कृत्य करणाऱ्या चीनविरोधात भारत सरकारने कडक पावले उचलण्याची आता वेळ आली आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.दरम्यान लडाखमधील गलवान घाटी परिसरातील गलवान खोऱ्यात आज भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये उडालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले आहे. तर चीनचे पाच सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या झटापटीवेळी सीमारेषेवर गोळीबार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. चीन सातत्याने असे म्हणत आहे की, हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे आहे, परंतु सैन्य माघारी घेण्यास तयार नाही. चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागेल, असे भारताने स्पष्ट केले होते. एलएसीवरील बदललेली परिस्थिती भारत कधीही स्वीकारणार नसल्याचंही मोदी सरकारनं स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक 

CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'

आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीchinaचीन