India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 15:44 IST2020-06-22T15:31:57+5:302020-06-22T15:44:07+5:30
खरेतर सरकार 1.8 लाख नवीन बुलेटप्रूफ जॅकेटची ऑर्डर देणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2019 मध्ये कंत्राटदाराने अमेरिका आणि युरोपचे जॅकेट दाखवून कंत्राट घशात घातले. परंतू नंतर चीहून रॉ मटेरिअल आयात करून जॅकेट तयार केले आहेत.

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?
नवी दिल्ली : लडाखमधील गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर चीनसोबतयुद्धाचे वारे वाहू लागले आहेत. याचबरोबर चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्नही सरकारकडून होऊ लागले आहेत. अशातच भारतीय जवानांना बुलेटप्रूफ जॅकेटची तातडीची गरज आहे. यावरून आता वाद सुरु झाला आहे. कारण गृह मंत्रालयाने 50000 बुलेटप्रूफ जॅकेटची खरेदी सुरु केली आहे. हे जॅकेट चीनच्या सीमेवर तैनात आयटीबीपीचे जवान करणार आहेत.
खरेतर सरकार 1.8 लाख नवीन बुलेटप्रूफ जॅकेटची ऑर्डर देणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2019 मध्ये कंत्राटदाराने अमेरिका आणि युरोपचे जॅकेट दाखवून कंत्राट घशात घातले. परंतू नंतर चीहून रॉ मटेरिअल आयात करून जॅकेट तयार केले आहेत. यामुळे नवीन ऑर्डर दिल्यास बुलेटप्रुफसाठी गरजेचे असलेले हाय परफॉर्मन्स पॉलिथीन (HPPE) चीनमधूनच आयात करण्याची शक्यता आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाला लवकरात लवकर ही जॅकेट हवी आहेत. यामुळे ऑर्डरही तातडीने देण्याची तयारी सुरु झाली आहे.
महत्वाचे म्हणजे याच महिन्यामध्ये 1.8 लाख बुलेटप्रूफ जॅकेटसाठी तीन टेंडर निघणार आहेत. यापैकी दोन आयटीबीपी आणि एक सीआरपीएफ जवानांसाठी निविदा असणार आहेत. मात्र, यासाठी केंद्र सरकार कंत्राटदारावर यासाठी लागणारे साहित्य चीनकडून मागवायचे की अन्य देशांकडून याबाबत दबाव आणू शकत नाही. इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार टेंडर भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. याआधी भारतीय सैन्य वापरत असलेले बुलेटप्रूफ जॅकेटचे साहित्य अमेरिका आणि युरोपमधून मागविले जात होते. 2018 मध्ये लष्कराने 639 कोटींच्या जॅकेटची ऑर्डर दिली होती. मात्र, ही जॅकेट चीनमधून मागविलेल्या साहित्याची बनविण्यात आली.
या जॅकेटला लागणारे 40 टक्के साहित्य हे चीनमधून मागविण्यात आले होते. म्हणजेच भारताने जे 639 कोटी रुपये कंत्राटदाराला दिले त्यातील मोठा हिस्सा हा चीनला गेला होता.
भारतासोबत विश्वासघात
कंत्राटदार निवडताना खरा धोका झाला आहे. या कंत्राटदाराने कंत्राट मिळविताना अमेरिका आणि युरोपची जॅकेट दाखविली होती. मात्र, कंत्राट मिळाल्यावर त्याने त्याचा पुरवठादारच बदलला. त्याने चीनवरून कच्चे साहित्य मागविले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात
फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली
...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा
शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा
चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा
देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले
चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग