India China FaceOff: चीनविरुद्ध भारतानं पुकारलं सायबर वॉर! देशाला घातक 'ही' अ‍ॅप वापरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:31 AM2020-06-30T02:31:54+5:302020-06-30T07:07:28+5:30

देशाला घातक अशा ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

India China FaceOff: India launches cyber war against China! Don't use this app! | India China FaceOff: चीनविरुद्ध भारतानं पुकारलं सायबर वॉर! देशाला घातक 'ही' अ‍ॅप वापरू नका!

India China FaceOff: चीनविरुद्ध भारतानं पुकारलं सायबर वॉर! देशाला घातक 'ही' अ‍ॅप वापरू नका!

Next

नवी दिल्ली : भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. भूसीमेवर डोळे वटारून पाहणाºया चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच हा निर्णय घेऊन सीमांचे बंधन नसलेल्या सायबर विश्वातही या कपटी शेजारी देशाविरुद्ध भारताने एक प्रकारे युद्धाचे बिगुल फुंकले आहे. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाºया चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.

ही अ‍ॅप वापरू नका!

टिकटॉक, शेअरइट, किवी, यूसी ब्राऊझर, बायडू मॅप, शेइन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लायकी, यूकॅम मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊझर्स, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊझर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफिड, बिगो लाइव्ह, सेल्फीसिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, माय व्हिडिओकॉल झिओमी,
वुई सिंक, ईएस फाईल एक्प्लोरर, ब्युटीप्लस, व्हिवा व्हिडिओ क्यूयू व्हिडिओ इंक, मीटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट हाईड, कॅचे क्लीनर डीयू अ‍ॅप स्टुडिओ,डीयू क्लीनर, डीयू ब्राऊझर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेन्डस, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर चिताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेअर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बैदू ट्रान्सलेट, वीमेट, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सेक्युरिटी सेंटर, क्यू क्यू लॉन्चर, यू व्हिडिओ, व्ही प्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड््स आणि डीयू प्रायव्हसी.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे म्हणणे...
या अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. या अ‍ॅप्सना मिळणारी माहिती भारताचे सार्वभौमत्व आणि ऐक्य यांच्या विरोधात वापरली जात असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीचा वापर देशाची सुरक्षा व सुव्यवस्था यांच्या विरोधात होत आहे.

Web Title: India China FaceOff: India launches cyber war against China! Don't use this app!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.