शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

India China FaceOff: चीनला शिकवणार अद्दल; भारताचेही सीमेवर क्षेपणास्त्र,आव्हान देण्याची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:29 AM

चीनने नियंत्रण रेषेच्या परिसरात बांधकाम सुरू केल्याने भारतानेदेखील त्यास प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे . गलवान खोऱ्यावरचा चीनचा दावा खोडून काढल्यानंतर ड्रॅगनची युद्धाची खुमखुमी भारत जिरवेल.

नवी दिल्ली : चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत घुसखोरी करणे महागात पडू शकेल, अशी तयारी भारताने सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केली आहे. चीनच्या दगाफटक्याचा अंदाज असल्याने हवाई हल्ला परतवणारे क्षेपणास्त्र ईशान्य लद्दाख सीमेवर सज्ज आह. लष्करी गुप्तहेर यंत्रणेनेही चिनी हेलिकॉप्टर घुसखोरी करण्याची शक्यता वर्तवली असून, त्यालाच कठोर संदेश देण्यासाठी भारताने क्षेपणास्त्र सज्ज ठेवले आहे.

लष्करी व राजनैतिक पातळीवरील चर्चेनंतर आता चीनशी संवाद साधण्यात काही अर्थ नाही, अशा विचारापर्यंत केंद्र सरकार व संरक्षण दले आली आहेत. चीनचा वन बेल्ट वन रोड, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि दक्षिण चीन समुद्रातील विस्ताराला भारताने तितक्याच ताकदीने आव्हान देण्याची रणनीती आखली आहे. आशिया खंडात अशांतता असल्यास (पान ६ वर) चीनचेच आर्थिक नुकसान होईल, हे उघडपणे जाणवत आहे. चीनच्या विस्तारवादी व आक्रमक धोरणांमुळे त्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणी मित्रच राहिलेला नाही.

चीनने नियंत्रण रेषेच्या परिसरात बांधकाम सुरू केल्याने भारतानेदेखील त्यास प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे . गलवान खोऱ्यावरचा चीनचा दावा खोडून काढल्यानंतर ड्रॅगनची युद्धाची खुमखुमी भारत जिरवेल. संरक्षणमंत्री व लष्कर तसेच हवाई दलप्रमुखांशी यांच्यात बैठका सुरू असून परिस्थिती चिघळल्यास प्रत्युत्तराची तयारी भारताने सुरू केली आहे. हवाई क्षेपणास्त्र स्वरक्षणासाठी सीमेवर हलवण्यात आले असले तरी प्रसंगी भारतीय जवानही आक्रमक पवित्रा घेतील. त्याला तिथे शस्त्रे वापरण्याची पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सैनिक १९९३ च्या करानान्वये अटीतटीच्या प्रसंगातही शस्त्राचा वापर करीत नाही. या करारात बदलाचे संकेत भारताने स्पष्टपणे दिले असून, त्यातून आम्ही युद्धास तयार आहोत, हाच संदेशच भारताने चीनला दिला आहे.ड्रॅगनचा घुसखोरीचा पवित्रा उघडपूर्व लडाख सीमेवरील पॅनगाँग त्सो सरोवर भागात चीनने नव्या हेलिपॅडचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे माघारीऐवजी चीनचा घुसखोरीचा पवित्रा उघड झाला आहे. सीमेवर ६ जूनपूर्वीची ‘जैसै थे’ स्थितीसाठी चीन तयार नसल्याचे दिसते. पॅनगाँग सरोवराच्या उत्तरेकडेत चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने तिथे निवाºयासाठी खोल्या, पिलबॉक्सेस व खंदक अशी बांधकामे केली होतीच. आता ‘फिंगर ४’ जवळ चीनचे सैन्य नवे हेलिपॅड उभारत आहे.चीनचे नाटक : पॅनगाँग सरोवर तीन बाजूंनी पर्वतराजींनी वेढलेले आहे. त्यांच्या सुळक्यांना ‘फिंगर १,२,३...’ असे संबोधले जाते. चीनच्या सैन्याचा कायमस्वरूपी तळ ‘फिंगर ८’पाशी असून, आणखी आठ किमी पश्चिमेस ‘फिंगर ४’पर्यंत हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.दक्षिणेकडील काठावरही चिनी सैन्याची उपस्थिती वाढली आहे. यातून आपण आधीपासूनच तिथे आहोत, असे भासवण्याचे नाटक चीन करीत आहे.दोन्ही सैन्ये आमने-सामनेत्या भागातील भारतीय सैन्याचा मुख्य तळ सध्या चीनचे सैन्य जेथे आहे तेथून दोन किमी पश्चिमेस ‘फिंगर ३’ पाशी आहे. त्याखेरीज ‘फिंगर ४’पाशी भारतीय सैन्याचा प्रशासकीय तळ आहे. चिनी सैन्याच्या ताज्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय सैन्यानेही ‘फिंगर ४’च्या आसपास अधिक तुकड्या तौनात केल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी दौन्ही सैन्ये अवघ्या ५०० मीटर अंतरावर आमने-सामने आहेत. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन