India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:41 PM2020-06-17T13:41:21+5:302020-06-17T14:40:36+5:30

व्हिडीओत ते म्हणतात, दोन दिवसांपूर्वी भारताचे 20 जवान शहीद झालेत.

India China Faceoff: congress leader rahul gandhis tweet on ladakh clash | India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल

India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल

Next

नवी दिल्लीः लडाखमधील संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानं देशभरात चीनविरोधात संताप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत सुमारे 43 चिनी सैनिक ठार झालेत. चिनी सैनिकांच्या या भयानक कृत्याचा देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत देशासाठी आपले प्राण देणा-या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये माजी काँग्रेस अध्यक्षांनी लिहिले होते की, 'देशातील शूर शहिदांना माझा सलाम. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसह एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडीओत ते म्हणतात, दोन दिवसांपूर्वी भारताचे 20 जवान शहीद झालेत. आमची जमीनही चीननं ताब्यात घेतली. पंतप्रधान (पंतप्रधान नरेंद्र मोदी) तुम्ही गप्प का आहात? तू कुठे लपून बसला आहात? बाहेर या, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. बाहेर या आणि देशाला सत्य सांगा, घाबरू नका, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे सोमवारी रात्री गॅलवान खो-यात भारत आणि चीनच्या सैन्यात हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. याखेरीज भारताच्या चार जवानांची परिस्थिती गंभीर आहे. लष्कराने याची खातरजमा केलेली आहे. त्याचवेळी या हिंसक चकमकीत चिनी सैन्याचंही मोठं नुकसान झालं आहे. भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात येणार आहे. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते.  हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले. ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे. भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत

India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

Web Title: India China Faceoff: congress leader rahul gandhis tweet on ladakh clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.