CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 08:24 PM2020-06-16T20:24:09+5:302020-06-16T20:47:57+5:30

गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे

CoronaVirus News: deaths numbers hide by audit commitee says devendra fadnavis | CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

Next

मुंबई- गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकार कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते आरोप आता खरे ठरताना दिसत आहेत. मुंबईत 862 आणि अन्य जिल्ह्यांतील 466 कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले. असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे, असा सवालच देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. ट्विट करत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रकही शेअर केलं आहे.

प्रसिद्धीपत्रकात लिहिलं आहे की, महाराष्ट्र शासनानं निर्देशित केल्याप्रमाणे मार्च २०२०पासून कोरोना प्रकरणांची पडताळणी करण्यात येत असून, त्यानुसार समायोजन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे. मुंबईत 862 आणि अन्य जिल्ह्यांतील 466 कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले. अन्य जिल्ह्यामध्ये आणखी मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशीलही प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेला आहे. तसेच या सर्व प्रकरणांमध्ये मृत्युसमयी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता व सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोव्हिड पॉझिटिव्ह केस म्हणून घेण्यात आल्याचंही अधोरेखित केलं आहे.
 

तसेच कोविडबाधितांच्या मृत्यूची संख्या, त्याबाबतचे विश्लेषण दैनंदिन आरोग्या वार्तापत्रातून देखली पारदर्शकपणे रोजच प्रसिद्ध करण्यात येत आहे. जन्म व मृत्यू नोंदणी कायदा, १९६९च्या तरतुदीनुसार मृत्यू प्रमाणपत्रामध्ये उचित नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचाही यात उल्लेख आहे. हाच धागा पकडत आता देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

हेही वाचा

CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत

India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक 

CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'

आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

Web Title: CoronaVirus News: deaths numbers hide by audit commitee says devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.