शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

India China FaceOff: घुसखोरी रोखल्यानंतर भारतीय जवानांचा चीनला आणखी एक धक्का; ड्रॅगनचा तिसरा डोळा उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 16:10 IST

India China FaceOff: चिनी सैन्याच्या कारवायांचा अंदाज घेत भारतीय जवानांनी ताब्यात घेतली ब्लॅक टॉप पोस्ट

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील तणाव चार महिन्यांपासून कायम असताना चीननं दोन दिवसांपूर्वी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चीनचे मनसुबे उधळून लावले. यासोबतच भारतानं ब्लॅक टॉप पोस्टवर कब्जा केला. ब्लॅक टॉप पोस्टचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पोस्टवर ताबा मिळवताच भारतानं चीनची टेहळणी यंत्रसामग्री आणि कॅमेरे हटवले.२९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्यानं पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. १५ जूनलादेखील चीननं अशाच प्रकारे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्याचा अनुभव गाठिशी असल्यानं २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री भारतीय जवानांनी चीनचे मनसुबे उधळून लावले. विशेष म्हणजे ब्लॅक टॉप पोस्टवर चीनची टेहळणी यंत्रणा आणि कॅमेरे असूनही भारतीय जवानांनी चिनी सैन्याला मागे रेटलं. त्यामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली पोस्ट भारतीयांच्या ताब्यात आली. ...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी ब्लॅक टॉप पोस्टवर कब्जा करताच भारतीय सैन्यानं तिथं लावण्यात आलेली टेहळणी सामग्री आणि कॅमेरे हटवले. ही पोस्ट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असून ती भारतीय हद्दीत येते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनची निगराणी यंत्रणा स्वयंचलित आहे. भारतीय जवानांच्या हालचाली टिपण्यासाठी पोस्टवर कॅमेरे आणि सेन्सर लावण्यात आले आहेत. ठाकुंगजवळ असलेल्या एका उंच चौकीवरूनही चिनी सैन्य भारतीय जवानांच्या हालचालींवर करडी नजर ठेवतं....अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिलेचिनी जवान उंचावरील पोस्टवर कब्जा करणार याचा अंदाज भारतीय जवानांनी बांधला होता. त्यामुळेच गेल्या आठवड्यात भारतीय सैन्याच्या विशेष ऑपरेशन युनिट आणि सिख लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी रणगाडाविरोधी तोफा डोंगराळ भागात उंचावर तैनात केल्या. विशेष ऑपरेशन युनिट कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास अतिशय सक्षम मानलं जातं....म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरेपेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स' म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्यांच्यामुळे भारत-चीन आले 'आमने-सामने'दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख