विरोधकांनी टीका केली, आम्ही संयम राखला; भारत-अमेरिका व्यापार करारावर पीएम मोदींचा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:36 IST2026-02-03T12:34:54+5:302026-02-03T12:36:47+5:30

India-America Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारानंतर एनडीएच्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत!

India-America Trade Deal: Opposition criticized, but we maintained restraint; PM Modi's reaction on India-America trade deal | विरोधकांनी टीका केली, आम्ही संयम राखला; भारत-अमेरिका व्यापार करारावर पीएम मोदींचा प्रतिक्रिया

विरोधकांनी टीका केली, आम्ही संयम राखला; भारत-अमेरिका व्यापार करारावर पीएम मोदींचा प्रतिक्रिया

India-America Trade Deal : भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतिक्षित व्यापार कराराची (ट्रेड डील) आज अखेर घोषणा झाली. या कराराअंतर्गत अमेरिकेने भारतावर लादलेला 50 टक्के कर, थेट 18 टक्क्यांवर आणला आहे. या कराराला मोदी सरकारच्या कूटनीतिक यशापैकी एक मानले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज संसद परिसरात एनडीए खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. 

ट्रेड डीलमुळे सकारात्मक वातावरण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनडीए संसदीय दलाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधक टीका करत होते, पण आम्ही संयम राखला आणि त्याचा परिणाम आज देशासमोर आहे. अमेरिका-भारत व्यापार करारामुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग वाढवा, दर्जेदार उत्पादने तयार करा, असे आवाहन पीएम मोदींनी केले. याशिवाय, त्यांनी सर्व खासदारांना संसदेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत, बजेटमधील उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.

9 देशांचा भारतावर विश्वास 

यावेळी केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने युरोपियन युनियन, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूके आणि अमेरिकेसह नऊ देशांसोबत व्यापार करार आणि मुक्त व्यापार करार (FTA) केले आहेत. ही साधी उपलब्धी नाही. जगभरात भारताचा दर्जा आणि विश्वास वाढला आहे. त्यामुळेच अनेक देशांनी भारतासोबत व्यापार करार करण्याचा निर्णय घेतला. या करारांमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title : भारत-अमेरिका व्यापार समझौते पर मोदी ने संयम को सराहा।

Web Summary : पीएम मोदी ने भारत-अमेरिका व्यापार समझौते की सराहना की और कम टैरिफ पर प्रकाश डाला। उन्होंने विनिर्माण और गुणवत्ता उत्पादन बढ़ाने का आग्रह किया। किरेन रिजिजू के अनुसार, नौ देशों ने भारत के साथ व्यापार समझौते पर हस्ताक्षर किए हैं, जिससे वैश्विक विश्वास बढ़ा है और अर्थव्यवस्था मजबूत हुई है।

Web Title : Modi hails India-US trade deal, credits restraint amid criticism.

Web Summary : PM Modi celebrated the India-US trade deal, highlighting reduced tariffs. He urged increased manufacturing and quality production. Nine nations have signed trade agreements with India, boosting global confidence and strengthening the economy, according to Kiren Rijiju.