शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 19:18 IST

I.N.D.I.A Coordination Committee Meet: समन्वय समितीच्या बैठकीत भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

I.N.D.I.A Coordination Committee Meet: अलीकडेच विरोधकांच्या INDIA आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा पहिली बैठक आज (13 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. यावेळी डी राजा, केसी वेणुगोपाल, तेजस्वी यादव, संजय राऊत, राघव चढ्ढा, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये विरोधकांची संयुक्त रॅली काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, जागावाटपाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पक्ष चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

वेणुगोपाल पुढे म्हणाले की, भोपाळमधील पहिल्या रॅलीत देशातील महागाई, बेरोजगारी आणि भाजपच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर भाष्य केले जाईल. तसेच, काही मीडिया ग्रुपच्या शोमध्ये इंडिया आघाडीतील कोणताही नेता सामील होणार नाही, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.  समन्वय समितीच्या बैठकीनंतर आपचे खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, सर्व पक्ष जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, ज्या जागा इंडिया आघाडीतील पक्षांकडे आहेत, त्या जागांवर चर्चा होणार नाही. आम्ही भाजप, एनडीएकडे असलेल्या जागांबाबत चर्चा करू. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत