हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करणाऱ्या शत्रूंना चोख उत्तर देण्यास सज्ज - बी. एस. धनोआ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 08:28 PM2018-11-11T20:28:23+5:302018-11-11T20:28:32+5:30

गेल्या काही दिवसांपासून चीननं हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करत आहे.

india alive to emerging threats in indo pacific says air chief marshal bs dhanoa | हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करणाऱ्या शत्रूंना चोख उत्तर देण्यास सज्ज - बी. एस. धनोआ

हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करणाऱ्या शत्रूंना चोख उत्तर देण्यास सज्ज - बी. एस. धनोआ

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून चीननं हिंद आणि प्रशांत महासागरात घुसखोरी करत आहे. अनेकदा भारताकडून चीनला या घुसखोरीसंदर्भात गंभीर इशाराही देण्यात आला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील वाढलेल्या वर्चस्वामुळे चीननं आता इतर देशांच्या समुद्राच्या हद्दीत घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी हिंद आणि प्रशांत महासागरातल्या वाढत्या धोक्यावर चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या सार्वभौमत्त्वाची सुरक्षा करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई दल सज्ज आहे.

शेजारील देशांमध्ये नवनवी शस्त्रास्त्रं, उपकरण आणि तंत्रज्ञान येत असल्यानं हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. भारत सीमावाद आणि परदेशी तत्त्वांच्या समस्यांचा सामना करत आहे. परंतु हवाई दल कोणत्याही समस्येशी दोन हात करण्यासाठी तयार आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांना उद्ध्वस्त करण्याची भूमिक हवाई दल बजावू शकतं. ते म्हणाले, हवाई दल नियंत्रण रेषेवरच्या संकटांना सामना करण्यासाठी पूर्णतः सक्षम आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता चीन आणि पाकिस्तानवरही हल्ला चढवला आहे. हवाई दल कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी 24 तास तयार आहे. हवाई दल नियंत्रण रेषेवरच्या कोणत्याही संकटांशी दोन करण्यासाठी सज्ज आहे. तसेच हिंद-प्रशांत महासागरातील भारताच्या सार्वभौमत्त्वाचं संरक्षण करण्यासाठी हवाई दल तत्पर असल्याचंही ते म्हणाले आहेत.

आमच्याजवळ जगातील सर्वात मोठं दुसरं सी-17 लढाऊ विमान आहे. भारत या लढाऊ विमानाच्या मित्र देशांच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठीही वापर करू शकतो. तसेच हिंद आणि प्रशांत महासागरातील संकटांचीही भारताला चांगली कल्पना आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं हिंद-प्रशांत महासागरात युद्धसराव केला होता. या युद्धसराव म्हणजे चीनला एक प्रकारचा इशाराच होता. त्यामुळे भारत चीनशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचं धनोवा म्हणाले आहेत. 

Web Title: india alive to emerging threats in indo pacific says air chief marshal bs dhanoa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.