शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

स्वतंत्र्य भारतात ही दुसरी निवडणूक ज्यात महागाईचा मुद्दा नाही - राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 9:27 AM

आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते

मंडी - भारताच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा असायचा. काँग्रेसच्या शासनकाळात महागाईचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत यायचा. मात्र 2004 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये महागाई हा मुद्दा आला नाही. कारण भाजपा सरकारचं आर्थिक धोरणाचं नियोजन अशारितीने केले होते त्यात महागाईवर नियंत्रण मिळवता आले असा दावा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे प्रचारसभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 2004 च्या आधी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होतं तर 2019 च्या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीत इतर मुद्दे आले पण महागाई मुद्दा आला नाही. भाजपा सरकारच्या काळात आर्थिक नियोजन केल्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवता आलं. त्याचसोबत भ्रष्टाचारावर प्रहार केल्यामुळे महागाई कमी झाली. पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली असताना भारतात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आलं. त्यामुळे महागाईला पाकिस्तानातून भारतात येता आलं नाही असा दावा त्यांनी केला. 

जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करुन बांग्लादेश बनवला होता त्यावर त्यांची जयजयकार झाली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसे सडेतोड उत्तर दिलं त्यांचा जयजयकार का करु नये. भारतीय जवानांचे कौतुक आम्ही प्रत्येक व्यासपीठावरुन करु. जवान देशासाठी सीमेवर तैनात असतात म्हणून आपण देशात सुरक्षित राहतो असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा नष्ट करणार सांगते मात्र आम्ही सत्तेत आलो तर देशद्रोहाच्या कायद्यातील त्रुटी दूर करुन हा कायदा आणखी सक्षम करु ज्यामुळे देशाच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चाप बसेल. आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते असा टोला राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लगावला. तसेच भाजपामध्ये बुथवर काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनू शकतो कारण आमच्याकडे परिवारवाद नाही असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHimachal Pradesh Lok Sabha Election 2019हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेस