Independence Day : कोण भरतंय गरिबांचे पोट? सरकार तर नाही...मग कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 10:31 IST2018-08-15T10:30:09+5:302018-08-15T10:31:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या आकड्यांचा उल्लेख

Independence Day : कोण भरतंय गरिबांचे पोट? सरकार तर नाही...मग कोण?
मुंबई : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी 72 व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त अनेक गोष्टींवर भाष्य केले. या मध्ये गरिबांना मिळणाऱ्या मदतीवरही त्यांनी मोठा खुलासा केला. देशातील गरिबांना सरकारकडून जी मदत मिळते, ती कोण देते माहितीये? सरकार नाही तर नियिमत कर भरणारा करदाता देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत होत असलेल्या वाढीचे आकड्यांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. तसेच त्यांची प्रशंसाही केली. यावेळी त्यांनी याच करदात्यांमुळे गरिबांच्या ताटामध्ये अल्प दरात अन्न मिळत असल्याचे सांगितले. देशात कोट्यवधी गरीब लोक आहेत. त्यांच्यावर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करते. याचे श्रेय सरकारला न जाता ते करदात्यांना जाते. आज दुपारी कुटुंबासोबत जेवत असताना माझ्या या वक्तव्याचा उल्लेख करावा, असे आवाहन मोदी यांनी केले.
कर भरल्यानंतर एक मानसिक समाधान मिळते. मात्र, देशात कर न भरण्यासंदर्भात वातावरण निर्माण केले जात आहे. कर भरल्यानंतर गरिबांच्या थाळीमध्ये जात असलेल्या अन्नामुळे आपल्याला किती समाधान मिळते याची कल्पनाही करता येणार नाही. एका करदात्यामुळे तीन गरिबांच्या पोटामध्ये अन्न जात असल्याचे मोदी यांनी सांगितले.