शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

वाढती असहिष्णुता हा बदनामीसाठी बनाव!

By admin | Updated: December 2, 2015 04:28 IST

असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील

नवी दिल्ली : असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत गेले दोन दिवस सरकारवर टीकेची तोफ डागणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रतिहल्ला करून लोकसभेतील चर्चेचा समारोप केला. भारत हा सहिष्णू होता आणि भविष्यातही तो तसाच राहील. वाढती असहिष्णुता हा केवळ सरकारला बदनाम करण्यास रचण्यात आलेला ‘बनाव’ आहे. सामाजिक व धार्मिक समरसता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा सडेतोड इशारा गृहमंत्र्यांनी दिला. आम्ही असहिष्णू आहोत; पण ही असहिष्णुता भ्रष्टाचाराविषयी, अस्वच्छ परिसराविषयी, दहशतवादाविषयी आणि महिलांवरील अत्याचार व तत्सम विषयांबाबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशात असहिष्णुतेचे सर्वांत मोठे शिकार कुणी ठरले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपा आहे, अशा शब्दांत भाषणाला सुरुवात करून राजनाथ सिंह म्हणाले, साहित्यिक, बुद्धिजीवी व कलावंतांना देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे वाटत असेल तर एकत्र बसून चर्चा होऊ शकते. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता. आम्ही कुठे चुकत असू तर ती चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ शकता.असहिष्णुतेच्या नावावर कागदी आणि बनावटी तोफगोळे डागले जात आहेत. विरोधी पक्षांचे असहिष्णुतेचे आरोप सरकारवर नाहीत तर समाज व राष्ट्रावर केलेले आरोप आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी देशात असहिष्णुतेच्या घटना घडल्या तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या का, असा सवालही राजनाथ सिंह यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)वाचाळांना संयमाचे फर्मानलोकसभेत विरोधक सरकारवर तुटून पडलेले असताना भाजपा संसदीय पक्षाची या अधिवेशनात प्रथमच बैठक झाली व त्यात चिथावणीखोर वक्तव्ये करू नका, संयम पाळा अशा सूचना पक्षाने आपल्या खासदारांना दिल्या.निषेध करणे हा राष्ट्रद्रोह; राहुल गांधींचा हल्लाअसहिष्णुतेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक मौन बाळगल्याचा आरोप करीत, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर प्रखर टीका केली. सहिष्णुता आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. त्यामुळेच लोकांचा आवाज दडपणाऱ्या ‘असहिष्णू’ पाकिस्तानचा धडा गिरवण्याऐवजी सरकारने देशातील जनतेचा आवाज ऐकावा, असा टोला राहुल यांनी लगावला.निषेधाचे, विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जात आहे. देशातील बुद्धिजीवी, साहित्यिक देशातील सध्याच्या वातावरणावर चिंता व्यक्त करीत आहेत. आपले पुरस्कार परत करीत आहेत. मात्र त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी विरोधाचे स्वर काढणाऱ्यांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले जात आहे. सहिष्णुता ही भारताची शक्ती आहे तर असहिष्णुता ही पाकची दुर्बलता आहे. त्यामुळेच पाकचा धडा गिरवू नका तर लोकांचा आवाज ऐका, त्यांना जवळ करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्या मताचा आदर करा. सरकार स्तरावरील विरोधाभास दिसतो आहे. कदाचित पंतप्रधानांना तो दिसत नसावा, असे राहुल म्हणाले.मोदी विदेशात जातात, संरक्षण क्षेत्रात एफडीआयच्या गोष्टी करतात; पण दादरीत हवाई दलात असलेल्या एका जवानाचा पिता मोहम्मद अखलाक मारला जातो. दोन दलित मुलांना जिवंत जाळले जाते. यावर आपले पंतप्रधान अवाक्षरही बोलत नाहीत. पंतप्रधान कौशल्य विकासाच्याही गप्पा करतात. पण एफटीआयआयचे विद्यार्थी त्यांच्यावर थोपण्यात येणाऱ्या एका व्यक्तीचा विरोध करतात, तेव्हा या कौशल्यनिपुण विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकणे पंतप्रधानांना महत्त्वाचे वाटत नाही. मोदीजी गुजरात मॉडेल आणि गुजरात शायनिंगच्याही बाता मारतात. मात्र पाटीदार आंदोलनाने गुजरातच्या विकासाचा फुगा कधीचाच फुटला आहे, असेही ते म्हणाले.विरोधकांचा सभात्यागकाँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचे राजनाथसिंह यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. गृहमंत्री देशातील घटनांवर बोलण्यापेक्षा परदेशातील उदाहरणे देत आहेत, असे सांगत काँग्रेस व अन्य सदस्यांनी सभात्याग केला.