शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

दिलासादायक: "कोरोनाच्या संसर्गात वाढ; मात्र नव्या लाटेची चिन्हे नाहीत!" अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 3:07 AM

कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून व अंतरनियम पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वासही परिषदेने व्यक्त केला आहे.  कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे देशात सध्या या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे की, अन्य काही कारणे त्यामागे आहेत, याचा शोध आम्ही घेत आहोत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत चाललेला असतानाच एक दिलासादायक बातमी शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी या महासाथीची दुसरी लाट येण्याची शक्यता तूर्तास दिसत नाही, असा निर्वाळा ‘सीएसआयआर’ने दिला आहे. (Increased corona infection; But there are no signs of a new wave)कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून व अंतरनियम पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वासही परिषदेने व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे देशात सध्या या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे की, अन्य काही कारणे त्यामागे आहेत, याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र, तूर्तास तरी कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता दिसत नाही, असे सीएसआयरचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले. दरम्यान, इतर देशांइतके रुग्णवाढीचे प्रमाण भारतात नसल्याचेही तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन केले आणि मास्कच्या वापराबाबत जनजागृती केली तर रुग्णसंख्या आटाेक्यात येऊ शकते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.एका दिवसात २० लाख लोकांना लसदेशात २० लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली. तर देशात शनिवारी कोरोनाचे २४,८८२ नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या १ कोटी १३ लाखांवर पोहोचली. महाराष्ट्राची स्थिती - 

महाराष्ट्रात शनिवारी १५ हजार ६०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, ८८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२,९७,७९३ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ८११ झाला आहे. राज्यात १ लाख १८ हजार ५२५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शनिवारी दिवसभरात ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण २१,२५,२११ रुग्ण काेराेनामुक्त झाले. 

उत्तर प्रदेश आघाडीवर -देशात लसीकरण मोहिमेत उत्तर प्रदेश हे राज्य आघाडीवर असून, तिथे शनिवारी एका दिवसात ३ लाख ३० हजार लोकांना लस देण्यात आली. 

आणखी सहा लसी... -- आणखी सहापेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसी भारतात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी दिली.- भारताने कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या दोन लसी विकसित केल्या असून त्यांचा जगभरातील ७१ देशांना पुरवठा केला आहे.- लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढे ही सुरू ठेवावे, असा सल्लाही आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर