शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'ITR फाइल करण्यासाठी आधार गरजेचं नाही, सरकारनं पर्याय द्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 16:26 IST

प्राप्तिकर रिटर्न फाइल करण्यासाठी आता आधार गरजेचं नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे.

नवी दिल्ली- प्राप्तिकर रिटर्न फाइल करण्यासाठी आता आधार गरजेचं नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. जर कोणाजवळ आधार नंबर नसेल तरीसुद्धा तो रिटर्न फाइल करू शकतो. तसेच आधार कार्ड नसलेल्यांसाठी प्राप्तिकर विभागानं ई-फायलिंगसाठी वेबसाइटवर खास व्यवस्था करावी, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.दिल्ली न्यायालयानं श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान असं म्हटलं आहे. न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या बाजूनं निर्णय दिला आहे. तसेच प्राप्तिकर विभागानं स्वतःच्या वेबसाइटवर आधार नसलेल्या लोकांसाठी आयटीआर फाइल करण्यासाठी वेगळा पर्याय द्यावा, असंही न्यायालयानं प्राप्तिकर विभागाला बजावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड हे प्राप्तिकर भरण्यासाठी अनिवार्य करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभागाकडून आदेश काढण्यात आल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात होता. ज्या नागरिकांकडे स्वत:चे आधार कार्ड नाही, त्या नागरिकांना आपल्या पॅनकार्डद्वारे प्राप्तिकर भरता येईल, असा निर्णय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला होता. त्याच निर्णयावर आता दिल्ली उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. 

केंद्राने बँक खाते, मोबाइल क्रमांक आदींसाठी आधार लिंक करणे सक्तीचे केले आहे. तसेच एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्रानं केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. विविध सेवांना आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे न्यायालयानं आदेश दिले होते. त्यावेळी सरकारने अतिरिक्त दोन महिने वाढवत 30 जूनपर्यंतची मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा पुढील वर्षाच्या 31 मार्च 2019पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. गेल्या मार्चअखेरपर्यंत 33 कोटींपैकी 16 कोटी 65 लाख पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयAdhar Cardआधार कार्डIncome Taxइन्कम टॅक्स