शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
2
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
3
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
4
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
5
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
6
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
7
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
8
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
9
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
10
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
11
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
12
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
13
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
14
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
15
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
16
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
17
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
18
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
19
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
20
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश

एका महीन्यात दोन वेळा मिळाला सोन्याचा मोठा 'खजिना', पाहून अधिकारीही झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 6:47 PM

Rajasthan me Sone ka Khajana: राजस्थानात गेल्या महिन्याभरात दोनवेळा कोट्यवधी रुपयांचा 'खजिना' सापडला आहे.

जयपूर: राजस्थानमध्ये गेल्या महिनाभरात दोनदा सोन्याचा 'खजिना' सापडला आहे. आयकर विभागाच्या कारवाईदरम्यान हा सोन्याचा खजिना पाहून अधिकारीही चकीत झाले. पहिला खजिना जोधपूर विभागात 17 डिसेंबर रोजी सापडला होता, तर दुसरा खजिना 7 जानेवारी रोजी सापडला. दरम्यान, हा खरा खजिना नसून, आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलेले सोने आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आयकर विभागाच्या पथकांनी जोधपूर आणि पाली येथील तीन व्यावसायिक समूहांवर छापे टाकले होते. त्या छाप्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर काळा पैसा सापडला होता. त्यावेळी प्राप्तिकर विभागाने 52 कोटी रुपयांचे दागिने आणि सुमारे 400 कोटी रुपयांची व्यावसायिक कागदपत्रे जप्त केली आहेत.

या कारवाईदरम्यान विभागाने पाली येथील गुगड ग्रुपकडून 226 कोटी रुपये, उमा पॉलिमर्स ग्रुपच्या जागेतून 50 कोटी रुपये, पीजी फॉइल्स ग्रुपकडून 50 कोटी रुपये आणि शाह यांच्याकडून 150 कोटी रुपयांची व्यावसायिक कागदपत्रे जप्त केली. आयकर विभागाला एकट्या शाह बंधूंच्या ठिकाणांतून 25 कोटींहून अधिक किमतीचे दागिने सापडले आहेत. तर गुगडच्या अड्ड्यावरून 20 कोटींचे दागिने सापडले आहेत.

9 किलोचे दागिने पाहून अधिकारी अवाक्नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आयकर विभागाच्या पथकांनी उदयपूरमधील हॉटेल व्यावसायिकांवर छापे टाकले. या कारवाईत सुमारे 9 किलो सोन्याचे दागिने आणि 3.30 कोटी रुपयांचा काळा पैसा सापडल्याने आयकर विभागाला धक्का बसला. येथे सापडलेल्या दागिन्यांची किंमत 5.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. या कारवाईत आयटी अधिकाऱ्यांनी 150 कोटींहून अधिक किमतीच्या काळ्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. यावेळी फतेह ग्रुप, रॉकवुड आणि एडीएम ग्रुपच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली.+

टॅग्स :GoldसोनंraidधाडIncome Taxइन्कम टॅक्सRajasthanराजस्थान