गुना - मध्य प्रदेशातील गुना येथे शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आलेला एक मृतदेह अचानक जिंवत झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काही क्षण त्याने इकडे तिकडे पाहिले, एक नजर स्वत:वर फिरवली आणि अचानक नग्नावस्थेतच युवकाने बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मृत युवकाला जिवंत धावताना पाहून तिथले सगळेच घाबरले. त्यानंतर युवकाला पकडण्यात आले. सल्फासचे सेवन केलेल्या एका युवकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
माहितीनुसार, गुना जिल्हा रुग्णालयात अत्यंत निष्काळजीपणाची घटना घडली आहे. याठिकाणी एका डॉक्टरने २० वर्षीय युवकाला मृत घोषित केले. त्यानंतर या युवकाच्या शरीराचे पोस्टमोर्टम करण्यासाठी बॉडी शवागृहात पाठवली. त्याचवेळी अचानक घडलेल्या घटनेने सर्वांनाच हैराण केले. जेव्हा हा युवक थंडगार शवागृहातील टेबलावर अचानक शुद्धीवर आला आणि स्वतःला नग्न अवस्थेत पाहून तो जीव वाचवण्यासाठी बाहेर धावला. मृत समजलेला माणूस आता जिवंत होऊन रुग्णालयाच्या आवारात पळत असल्याचे दृश्य पाहून रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. या घटनेने हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला.
काय आहे प्रकार?
जॉन पारदी नावाच्या युवकाने मानसिक दडपणाखाली येत विषारी औषध सल्फासचे सेवन केले होते. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत घरच्यांनी त्याला गुना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. जिथे डॉक्टरांनी कुठलीही चाचणी अथवा तपासणी न करता त्याला मृत घोषित केले. हॉस्पिटल प्रशासनाने घाईगडबडीत कागदपत्रांची पूर्तता केली आणि युवकाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर तिथे युवक शुद्धीवर आला होता.
तर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका थंड टेबलावर पूर्णपणे नग्न अवस्थेत असल्याचं दिसले. आजूबाजूला मृतदेहांचा दुर्गंध आणि सर्वत्र पसरलेली शांतता पाहून आपण शवागारात आहोत आणि डॉक्टर आपल्याला मृत समजून आपले शवविच्छेदन करणार आहेत हे माझ्या लक्षात आले. मृत्यूच्या भीतीने मी त्याच अवस्थेत शवागारातून बाहेर पळालो असं या युवकाने सगळ्यांना सांगितले. मागील आठवड्यात ही घटना घडली, जी आता पीडित आणि त्याचे कुटुंबीय उघड करत आहेत. रुग्णालय प्रशासनाने माझी सर्व कागदपत्रे आणि दस्तावेज गायब केलेत असा आरोप या युवकाने केला.
दरम्यान, हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आला आहे. स्थानिक लोकांनी या प्रकाराबाबत डॉक्टरांना दोषी ठरवत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अद्याप या घटनेवर हॉस्पिटल प्रशासनाकडून कुठलेही स्पष्टीकरण आले नाही. परंतु या प्रकारामुळे आरोग्य सेवेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
Web Summary : In Guna, India, a man declared dead woke up in a morgue. He fled naked, shocking hospital staff. He had consumed poison. Doctors face scrutiny for negligence after prematurely declaring him dead. Investigation is underway.
Web Summary : गुना में मुर्दा घोषित व्यक्ति मुर्दाघर में जागा। नग्न होकर भागा, अस्पताल कर्मचारी हैरान। उसने जहर खाया था। डॉक्टरों पर लापरवाही का आरोप, समय से पहले मृत घोषित किया। जांच जारी है।