एका प्रियकरासाठी दोन मैत्रिणींमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी; वाद चिघळताच तरूण फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:53 IST2023-01-16T12:51:26+5:302023-01-16T12:53:25+5:30
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

एका प्रियकरासाठी दोन मैत्रिणींमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी; वाद चिघळताच तरूण फरार
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातीलवाराणसी येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. प्रेम आंधळे असते असे बोलले जाते. प्रेमीयुगुल प्रेमाच्या नदीत इतके बुडलेले असतात की त्यांना समाजाची भीतीही वाटत नाही आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. वाराणसीमध्ये रविवारी असाच एक प्रकार पाहायला मिळाला, जिथे प्रियकरासाठी दोन तरुणी एकमेकांशी भिडल्या. दोघींमध्ये बराच वेळ हाणामारी सुरू होती. महिला पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघींनाही पोलीस ठाण्यात आणून कडक सूचना दिल्या. यानंतर पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली.
दरम्यान, प्रियकरासाठी भररस्त्यात 2 तरूणींची हाणामारी पाहून सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या मांडूवाडीह येथे राहणाऱ्या एका तरुणाचे शहरातील एका तरुणीशी जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.
प्रेयसीला भांडताना पाहून प्रियकर फरार
यादरम्यान संबंधित प्रियकराने दुसऱ्या एका तरुणीशी देखील मैत्री केली. मात्र, त्याच्या प्रेयसीला याची माहिती नव्हती. मकर संक्रांतीच्या दिवशी तरुणाने आपल्या पहिल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावले. तिथे भाजी मार्केटजवळ तो त्याच्या मैत्रिणीशी बोलत होता.
प्रियकराने काढला पळ
तेवढ्यात त्या तरूणाची प्रेयसी त्याच मार्गाने कुठेतरी जात होती. अचानक तिची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या तिच्या प्रियकरावर गेली तेव्हा ती स्तब्ध झाली. प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहून ती संतापली. तिने प्रियकरासोबत असलेल्या मुलीची विचारपूस सुरू केल्यावर काही वेळातच दोघींमध्ये वाद सुरू झाला. दोघींमधील वाद हाणामारीत पोहोचला आणि त्या दोघी रस्त्याच्या मधोमध एकमेकींना मारहाण करू लागल्या. दोघींमध्ये भांडण सुरू होताच प्रियकराने घटनास्थळावरून पळ काढला. काही लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"