पत्नी लग्नानंतरही आधीच्या प्रियकराला भेटायची; व्यथित झालेल्या मजुराने आत्महत्या करून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 17:03 IST2023-01-18T17:02:53+5:302023-01-18T17:03:16+5:30
उत्तर प्रदेशातील भदोही येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पत्नी लग्नानंतरही आधीच्या प्रियकराला भेटायची; व्यथित झालेल्या मजुराने आत्महत्या करून संपवलं जीवन
भदोही : उत्तर प्रदेशातील भदोही येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भदोही शहरातील कोतवाली भागातील मरियडापट्टी येथे राहणाऱ्या एका मजुराने पत्नीच्या व्यापाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, शहर कोतवालीच्या धरोहर चौकी भागात राहणारा 28 वर्षीय सतीश कुमार हरिजन याचा 10 महिन्यांपूर्वी त्याच जिल्ह्यातील गोपीगंज येथील रहिवासी पूजासोबत विवाह झाला होता. पूजाचे लग्नापूर्वी एका तरुणावर प्रेम होते आणि लग्नानंतरही ती तिच्या प्रियकराला भेटत असे. पत्नीच्या अशा वागण्याने सतीश त्रासला होता.
पत्नी प्रियकरासोबत गेली
रविवारी सायंकाळी उशिरा सतीश मजुरी करून घरी परतला असता त्याची पत्नी मोबाईलवर बोलत असल्याचे पाहून त्याने फोन हिसकावून घेतला. त्याची पत्नी आपल्या प्रियकराशी बोलत असल्याचे त्याला समजले. यावरून दोघांमध्ये वाद व हाणामारी झाली. यानंतर पूजाने तिच्या प्रियकराला फोन करून बोलावले आणि ती त्याच्यासोबत गेली.
या घटनेनंतर सतीशने खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. खरं तर सतीश आणि त्याची पत्नी यांच्यात मागील काही महिन्यांपासून याच मुद्द्यावरून वाद व्हायचा. मात्र, पत्नीच्या कृत्याला कंटाळलेल्या सतीशने आत्महत्या करून जीवन संपवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"