शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या भावाला फोन करायची हिंमतच कशी झाली?; सरन्यायाधीश भडकले, सुप्रीम कोर्टात वातावरण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 21:08 IST

मी गेल्या २३ वर्षांपासून अशा लोकांशी व्यवहार करत आलोय. त्यांच्याशी कसं वागायचं मला माहितेय असं सरन्यायाधीशांनी खडसावले.

नवी दिल्ली - एका प्रकरणाशी निगडित आदेशावरून आलेल्या फोननंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्य कांत चांगलेच संतापले. सरन्यायाधीशांकडून देण्यात आलेल्या आदेशावरून त्यांच्या भावाला फोन केल्याबद्दल त्यांनी कोर्टात तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमच्या पक्षकाराविरुद्ध अवमान कारवाई का सुरू करू नये? सरन्यायाधीशांनी हा आदेश कसा दिला, हे माझ्या भावाला फोन करून विचारण्याची त्यांची हिंमतच कशी झाली? तो मला काही निर्देश देतोय का? असे कडक ताशेरे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी ओढले.

संतापलेले सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही या गोष्टीची पुष्टी करा आणि त्यानंतर एक वकील म्हणून सर्वात आधी तुम्ही या खटल्यातून हटले पाहिजे. भलेही ते भारताबाहेर लपले असतील. अशा लोकांशी कसे वागावे हे मला माहीत आहे. यापुढे असं करण्याचं धाडस कधीही करू नका. मी गेल्या २३ वर्षांपासून अशा लोकांशी व्यवहार करत आलोय. न्यायपालिकेच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असं त्यांनी खडसावून सांगितले.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण हरियाणातील दोन विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी बौद्ध अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत उत्तर प्रदेशातील सुभारती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा केला आणि पुरावा म्हणून प्रमाणपत्रे सादर केली, परंतु वैद्यकीय महाविद्यालयातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीच हे धर्मांतर केले असावे असा संशय कोर्टाला आला. हे विद्यार्थी 'पुनिया' जातीचे होते, जी जात सामान्यतः सर्वसाधारण प्रवर्गात येते असं सरन्यायाधीशांना आढळून आले त्यामुळे कोर्टाने याला आरक्षणाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न म्हटलं. खटल्यावेळी  जेव्हा याचिकाकर्त्यांच्या वडिलांनी अयोग्य वर्तन केल्याचे किंवा अवाजवी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले तेव्हा त्यांच्या वकिलाने कोर्टाची माफी मागितली. आपल्याला याबद्दल माहिती नव्हती असं वकिलाने कोर्टात सांगितले.

हा फसवणुकीचा प्रकार - सरन्यायाधीश

हरियाणाच्या अधिकाऱ्यांवरही प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे कोर्टाने गंभीर निरीक्षण नोंदवले. सरन्यायाधीशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने हरियाणाच्या मुख्य सचिवांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रे जारी करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याला फसवणुकीचा एक प्रकार असल्याचं म्हटलं. त्यानंतर कोर्टाने भाऊ-बहिणीची याचिका फेटाळून लावली. "तुम्हाला अल्पसंख्याकांचे हक्क काढून घ्यायचे आहेत. तुम्ही उच्च जातीचे आहात. तुमच्या क्षमतांचा अभिमान बाळगा असं सरन्यायाधीशांनी म्हटलं होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Chief Justice Furious Over Brother's Phone Call; Supreme Court Heated

Web Summary : Chief Justice Kant rebuked a lawyer for contacting his brother regarding a case order. He suspected influence in a medical admission fraud involving minority certificates and warned against judicial interference, demanding accountability from involved parties. Court dismissed the petition, calling it fraud.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय