होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:27 IST2025-06-24T11:26:23+5:302025-06-24T11:27:32+5:30

शकील नावाच्या व्यक्तीने त्याच्या अल्पवयीन मुलाचे खेमपूर गावातील एका मुलीसोबत लग्न ठरवले होते.

In Rampur Father-in-law who ran away with his future daughter-in-law returns after 8 days; new twist in the story | होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट

होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट

रामपूर - सून आणि सासऱ्याचं नाते बाप-लेकीसारखे असते परंतु उत्तर प्रदेशातील रामपूर येथे एका बापाने त्याच्या मुलाच्या होणाऱ्या बायकोलाच पळवून नेले. सुनेसोबत पसार झालेला सासरा ८ दिवसांनी तिला घेऊन घरी परतला आहे. हे दोघे आता सून-सासरे नसून पती-पत्नी बनले आहेत. याच प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. मुलगा लग्नासाठी तयार नव्हता, कारण तो अल्पवयीन होता. परंतु वडिलांनी त्याला मारहाण करून लग्नासाठी दबाव टाकल्याचे समोर आले मात्र लग्नाआधीच वडिलांनी होणाऱ्या सुनेला पळवून नेले.

शकील नावाच्या व्यक्तीने त्याच्या अल्पवयीन मुलाचे खेमपूर गावातील एका मुलीसोबत लग्न ठरवले होते. कुटुंबाने त्यावर आक्षेप घेतला परंतु शकीलने पत्नी आणि मुलाला मारहाण करत त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. शकीलच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहे. शकील कायम मला मारहाण करायचा, मी घरगुती हिंसाचाराचा बळी आहे असं शकीलच्या पत्नीने म्हटले. 

मुलाचे लग्न ठरल्यापासून शकील त्याच्या होणाऱ्या सुनेसोबत सातत्याने फोनवर बोलायचा. दिवसभर, रात्रभर कॉल सुरू असायचा. जेव्हा कुटुंबाने याबाबत विचारणा केली तेव्हाही शकीलने शिवीगाळ करत पत्नीला मारहाण केली. विशेष म्हणजे लग्नाआधी शकील आणि त्याच्या होणाऱ्या सुनेला बऱ्याचदा संशयास्पद स्थितीत पाहिले होते. त्यावर मुलाने आक्षेप घेतला तेव्हा शकील भडकला होता असं त्याच्या पत्नीने सांगितले. शकीलची पत्नी आता दारोदारी भटकत असून न्यायासाठी ती मागणी करत आहे. 

दरम्यान, ज्या पतीला त्याच्या मुलासाठी बायको आणायची होती, त्यानेच मुलाच्या होणाऱ्या पत्नीला स्वत:ची पत्नी बनवले. आता ती मुलगी माझी सवत बनली आहे. माझ्या माहेरी कुणीही नाही जे माझी मदत करू शकतील. शकीलची ३ मुले पत्नीसोबत आहेत. वडिलांच्या या प्रकारावर मुलेही नाराज झाली आहेत. 

मुलानं लग्नास दिला होता नकार

शकील आणि मुलीमधील होणारा संवाद पाहून मुलाने लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. मुलाने वडील आणि होणाऱ्या पत्नीमधील कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवले. वडील करत असलेल्या प्रकारामुळे लाज वाटते. मी अल्पवयीन आहे, या नात्यासाठी तयार नव्हतो. परंतु वडिलांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला. पण त्या मुलीसोबत तेच सतत बोलत बसायचे आणि एक दिवस तिला घेऊन पळून गेले असं मुलाने म्हटलं. 

Web Title: In Rampur Father-in-law who ran away with his future daughter-in-law returns after 8 days; new twist in the story