UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:21 IST2025-09-12T15:20:59+5:302025-09-12T15:21:22+5:30

खोलीत वेदनेने किंचाळत असताना घरमालकाने त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले, सध्या या मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

In Prayagraj UP a boy who preparing for UPSC took a shocking step; he cut off his private part | UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...

UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...

प्रयागराज - उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे यूपीएससी तयारी करणाऱ्या एका युवकाने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेव्हा हा युवक त्याच्या खोलीत वेदनेने किंचाळत होता, त्यावेळी आसपासच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलला नेले. या युवकाने हे कृत्य का केले याचे कारण समजताच सगळ्यांनाच धक्का बसला. 

या युवकाला त्याचे जेंडर चेंज करायचे होते. त्यासाठी त्याने आधी एनेस्थेसियाचे इंजेक्शन घेतले. त्यानंतर सर्जिकल ब्लेडने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर खोलीत वेदनेने किंचाळत असताना घरमालकाने त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. जिथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहून एसआरएन हॉस्पिटलला न्यायला सांगितले. या युवकाचे वय २३ असून त्याला जेंडर चेंज करून मुलगी बनायचे होते. त्यासाठी त्याने एनेस्थेसियाचे इंजेक्शन घेतले होते. त्यानंतर स्वत:च सर्जरी करू लागला. परंतु प्रायव्हेट पार्ट कापताच तो किंचाळला. त्यानंतर आसपासचे लोक धावत त्याच्या खोलीकडे गेले. 

सध्या या मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या युवकाला मुलापासून मुलगी बनायचे होते. परंतु त्याचे कुणी ऐकले नाही. त्यामुळे हे पाऊल त्याने उचलले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून मला मुलगी बनायचे आहे असं या युवकाने सांगितले. हा युवक अमेठीत राहणारा असून आई वडिलांसाठी तो एकुलता एक आहे. त्यामुळेच त्याला घरच्यांना काही सांगता आले नाही. काही दिवस तो मावशीकडे आला. तिथे शिक्षण घेऊन तो प्रयागराजला आला. शहरात एक खोली भाड्याने घेऊन तो यूपीएससीच्या परीक्षांच्या तयारी करत होता. 

Youtube वर केले होते सर्च

प्रयागराजला शिक्षण घेताना त्याने जेंडर चेंज करण्यासाठी युट्यूबवर सर्च केले होते. त्यानंतर त्याने एका डॉक्टरशी संपर्क साधला. त्याच्या सांगण्यावरूनच त्याने एनेस्थेसियाचे इंजेक्शन आणि सर्जिकल ब्लेड मेडिकल स्टोअरमधून खरेदी केली. त्यानंतर स्वत:च इंजेक्शन लावले, त्यानंतर कमरेखालचा भाग सुन्न झाला. मग त्याने हाताने प्रायव्हेट पार्ट कापला. इंजेक्शनाची गुंगी जेवढी होती तोपर्यंत काही वाटले नाही परंतु त्याचा परिणाम उतरताच तो वेदनेने व्याकुळ झाला. १ तास तो खोलीत विवळत होता. जमिनीवर रक्त पडले होते. त्यानंतर घरमालक तिथे पोहचला असता त्याने रुग्णवाहिका बोलावून तातडीने जखमी युवकाला हॉस्पिटलला नेले. 

Web Title: In Prayagraj UP a boy who preparing for UPSC took a shocking step; he cut off his private part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.