काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांचे थैमान, अभिनेत्रीची केली हत्या, पुतण्यावरही झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 23:43 IST2022-05-25T23:42:47+5:302022-05-25T23:43:25+5:30
Terror attack in Kashmir: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात एक लहान मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहेत. तर दहशतवाद्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची हत्या केली आहे.

काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांचे थैमान, अभिनेत्रीची केली हत्या, पुतण्यावरही झाडली गोळी
श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात एक लहान मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहेत. तर दहशतवाद्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची हत्या केली आहे. तर मंगळवारी दहशतवाद्यांनी एका कॉन्स्टेबलला लक्ष्य केले होते. त्यामध्ये ९ वर्षांची मुलगी जखमी झाली होती.
आज दहशतवाद्यांनी एका टीव्ही अभिनेत्रीवर हल्ला केला. ज्यामध्ये तिचा १० वर्षांचा भाचा जखमी झाला. अभिनेत्री अमरीन भट ह्या घराबाहेर १० वर्षीय पुतण्यासोबत उभ्या होत्या. तेव्हा अचानक हल्लेखोरांनी तिच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्यानंतर दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अमरीन हिचा उपचारांदरम्यान, मृत्यू झाला. तर तिच्या पुतण्याच्या हाताला गोळी लागली. त्याची प्रकृती आता स्थिर आणि धोक्याबाहेर आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसराला घेराव घातला आहे.
दरम्यान, मंगळवारी दहशतवाद्यांनी दोन हल्ले केले होते. यातील एका हल्ल्यात दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलीस दलातील कॉन्स्टेबल सैफुल्ला काद्री यांची हत्या केली होती. या हल्ल्यात त्यांची ९ वर्षीय मुलगी जखमी झाली होती. तर कुलगाममध्ये झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकून गोळीबार केला होता. त्यात १५ जण जखमी झाले होते.