फिरायला नेतोय सांगून 9वीतील मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य; 2 आरोपींना अटक, 1 फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:02 IST2023-01-16T16:01:51+5:302023-01-16T16:02:42+5:30
छत्तीसगडमधील जगदलपूरमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

फिरायला नेतोय सांगून 9वीतील मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य; 2 आरोपींना अटक, 1 फरार
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील जगदलपूरमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, तीन मित्रांनी मिळून नववीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारासारखी धक्कादायक घटना घडवून आणली. खरं तर आरोपी गुन्हा करून पळून गेले. बलात्काराच्या वेळी विद्यार्थिनीला कोल्ड्रिंकमध्ये दारू पाजण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीनंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपीच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे. तर एका आरोपीला पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही.
फिरायला नेण्याच्या बहाण्याने मित्राने नेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला तिच्याच शाळेतील विद्यार्थ्याने फिरायला नेतो असे सांगून बोलावले होते. मात्र नियोजनानुसार त्याचे अन्य दोन मित्रही तेथे पोहोचले. तिघांनी मिळून विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारासारखी घृणास्पद घटना घडवली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 जानेवारीची आहे. विद्यार्थिनीने घरी आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर तिन्ही अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण गांभीर्याने घेत बोधघाट पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, अद्याप एक आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल. पीडितेवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"