शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, ९ जणांना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 14:02 IST

Kolkata rape-murder : आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं रुग्णालय आणि परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.

Kolkata rape-murder: कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात झालेल्या तोडफोडीप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या रुग्णालयाच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनानं बुधवारी मध्यरात्री भीषण वळण घेतलं. आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं रुग्णालय आणि परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.

याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगाल आणि देशभरात बुधवारी रात्री ११.५५ वाजता 'रिक्लेम द नाईट' मोहिमेचा भाग म्हणून निदर्शनं सुरू झाली. या मोहिमेनं सोशल मीडियाद्वारे वेग घेतला होता. फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत समाजाच्या सर्व स्तरातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. सुरुवातीला आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाबाहेर हे निदर्शन अत्यंत शांतपद्धतीनं सुरू होतं. परंतु, काही वेळातच या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. 

जमावानं जबरदस्तीने बॅरिकेड्स तोडून रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या आपत्कालीन वॉर्डमध्ये जमावानं घुसून गोंधळ घातला. तसंच, रुग्णालयातील अनेक महागड्या मशिन्स, औषधांचा साठा, डॉक्टरांच्या चेंजिंग रूम आणि पोलिस बॅरेकची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. याशिवाय, जमावानं रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी याठिकाणी पोलिस बंदोबस्त फारच कमी होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इतर ठिकाणांहून पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आरजी कर रुग्णालयामधील गुंडगिरी आणि तोडफोडीनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा परिस्थितीत, लोकप्रतिनिधी म्हणून मी कोलकाता पोलिस आयुक्तांशी बोललो आणि हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवण्याची विनंती केली. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी पुढील २४ तासांत त्याला कायद्याच्या कक्षेत आणलं पाहिजे, असं अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी