एक तरूण दोन मुलींसोबत 'नको त्या अवस्थेत' रंगेहात सापडला; तिघांनाही झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 18:37 IST2023-03-15T18:36:43+5:302023-03-15T18:37:27+5:30
दोन मुलींना आपल्या घरी घेऊन आला म्हणून पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

एक तरूण दोन मुलींसोबत 'नको त्या अवस्थेत' रंगेहात सापडला; तिघांनाही झाली अटक
नवी दिल्ली : दोन मुलींना आपल्या घरी घेऊन आला म्हणून पोलिसांनीअटकेची कारवाई केली आहे. छत्तीसगडमधील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जांजगीर-चंपा जिल्ह्यातील शिवरीनारायण पोलीस स्टेशन हद्दीतील घरात एक मुलगा दोन मुलींसह नको त्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या घरात धाव घेतली. घराची झडती घेतली असता तिथे दोन मुली सापडल्या. या दोघींसोबत एक तरुण देखील होता. हे घर या तरुणाचे असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक करून अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे याबाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यानंतर शिवनारायण पोलिसांनी एक टीम तयार केली आणि घरावर छापा टाकून दोन मुली आणि एका तरुणाला रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लव कुमार भट्ट नावाचा तरुण बाहेरील मुलींना आपल्या घरात आणायचा आणि त्यांच्यासोबत चुकीचे काम करायचा.
तिघांनाही अटक
शिवरीनारायण पोलिसांनी एक टीम बनवून घरावर छापा टाकला तेव्हा लवकुमार भट्ट हा दोन मुलींसह नको त्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले आहे. पकडलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी कोरबा जिल्ह्यातील तर दुसरी मुलगी मुंगेली जिल्ह्यातील लोर्मी येथील आहे. शिवरीनारायण पोलिसांनी लवकुमार भट्ट आणि दोन्ही मुलींना अटक केली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"