नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा; काँग्रेसची मते फुटणार की JDU ला धक्का बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 07:00 AM2024-02-12T07:00:46+5:302024-02-12T07:01:24+5:30

यावेळी शेकोटीभोवती बसलेल्या गिटार वाजवणाऱ्या आमदाराचे कौतुक करतानाचा यादव यांचा व्हिडीओ पक्षाने शेअर केला आहे.

In Bihar, Nitish Kumar will face a majority test in the assembly today | नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा; काँग्रेसची मते फुटणार की JDU ला धक्का बसणार?

नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा; काँग्रेसची मते फुटणार की JDU ला धक्का बसणार?

पाटणा : बिहारमधील नितीशकुमार सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत सोमवारी चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये अचानक परतल्यामुळे महाआघाडीने एका महिन्यापूर्वीच राज्यात सत्ता गमावली.

२४३ सदस्यांच्या विधानसभेत १२८ आमदारांसह एनडीएची स्थिती मजबूत आहे. तरीही १९ आमदार असलेल्या काँग्रेसला विश्वासदर्शक ठरावापूर्वी फूट पडण्याच्या भीतीने ग्रासले होते, यामुळेच त्यांनी आपल्या आमदारांना हैदराबादला नेले होते. शनिवारी तेजस्वी यादव यांच्या घरी स्नेहभोजनासाठी पोहोचलेल्या राजद आमदारांना विश्वासदर्शक ठरावापर्यंत थांबण्यास सांगण्यात आले. यावेळी शेकोटीभोवती बसलेल्या गिटार वाजवणाऱ्या आमदाराचे कौतुक करतानाचा यादव यांचा व्हिडीओ पक्षाने शेअर केला आहे.

Web Title: In Bihar, Nitish Kumar will face a majority test in the assembly today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.