शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

'एकतर्फी प्रेमात' पागल तरूणाचा तरूणीने नंबर केला ब्लॉक; वेडा प्रियकर टॉवरवर चढला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 7:48 PM

राजस्थानमधील एका प्रेमवेड्या तरूणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील एका प्रेमवेड्या तरूणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तरूणाने आपल्या प्रेमासाठी हाय व्होल्टेज ड्रामा करून तरूणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका माथेफिरू प्रियकराने असे कृत्य केले की तब्बल तासभर पोलीस आणि प्रशासनाला चिंतेत टाकले. या वेड्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला, त्यानंतर तो मोबाईल टॉवरवर गेला. तासाभरानंतर पोलीस प्रशासनाने त्याला खाली आणले आणि नंतर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली.

माहितीनुसार, ही घटना भीलवाडा जिल्ह्यातील बदनौर शहरातील आहे. बदनौर येथील प्रकाश प्रजापत याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो तरुणीला वारंवार फोन करून त्रास देत असे. त्यामुळे त्रासलेल्या तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला. यामुळे तो संतप्त झाला. त्यानंतर तो मोबाईल टॉवरवर चढला आणि तरुणीशी बोलण्याचा हट्ट करू लागला. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण परिसरात पसरली. मग परिसरातील लोक टॉवरखाली जमा होऊ लागली. 

पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली धावलोकांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले पण तो मान्य झाला नाही आणि टॉवरवर चढत राहिला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील खाली उतरण्यासाठी आग्रह केला, मात्र तरीदेखील तरूण खाली उतरला नाही. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तरूणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याने ऐकले नाही आणि आधी मुलीशी बोला, मग खाली येईल, अशी मागणी त्याने केली.

पोलिसांनी तरूणाला केली अटकजवळपास तासभर फोनवरून त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर तरुणाने एका फोनवर तरुणीला समोर आणण्याची मागणी केली. यानंतर गावातील काही लोकांनी मुलीच्या घरी जाऊन व्हिडीओ कॉलवरून तरूणाशी संवाद साधायला सांगितला. त्यानंतर तो तरुण खाली उतरला. तरुण खाली उतरताच शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Rajasthanराजस्थानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसArrestअटक