शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Crime: पतीला काही मिनिटांत पुन्हा ठेवायचे होते संबंध; पत्नीने नकार देताच त्याने दाखवला राक्षसी अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:44 IST

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पत्नीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने तिची हत्या केली. 

नवी दिल्ली : शारिरीक संबंध ठेवण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तीने काही तासातच पत्नीला दोनदा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला. मात्र पत्नीने नकार दिल्याने त्याने राक्षसी अवतार दाखवत तिची हत्या केली. खरं तर ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील आहे. अमरोहा जिल्हा पोलिसांनी केलेल्या तपासात पतीचा क्रूरपणा समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता संपूर्ण घटना समोर आली.

पतीने दाखवला राक्षसी अवतार अमरोहा जिल्ह्यातील कोतवाली येथील मोहल्ला सराय कोहना येथील बेकरी संचालक अन्वर याने पत्नी रुखसारसोबत 5 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास संबंध ठेवले होते. काही वेळाने अन्वरने पत्नीला पुन्हा संबंध ठेवण्यास सांगितले असता तिने नकार दिला. पत्नीने वाद सुरू केल्याने रागाच्या भरात अन्वरने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला आणि पत्नीचा मृतदेह प्लास्टिकमध्ये भरून दुचाकीवरून रतुपुरा गावातील जंगलाच्या काठावर रस्त्यावर फेकून दिला. या घटनेवरून मुरादाबाद जिल्हा अमरोहा नगर कोतवाली येथे पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

पोलिसांच्या चौकशीत आरोपी पतीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पतीचे हे कृत्य ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रस्त्याच्या कडेला मृतदेह पाहून गावकऱ्यांनी मुरादाबाद पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचे फोटो अनेक जिल्ह्यांमध्ये मृत महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पाठवले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या जिल्ह्यातील अशा महिलांची माहिती देखील गोळा केली, ज्यांची बेपत्ता झाल्याची नोंद नुकतीच झाली होती. फोटोवरून संबंधित मृतदेहाची ओळख पटली. 

आरोपी आणि त्याच्या भावाला घातल्या बेड्यात्यानंतर अमरोहा पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि या घटनेत त्याने आपला भाऊ दानिशची मदत घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक