शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाचे....

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल
निहारवाणी : परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. मिरची पिकावर चुरडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर विविध कीटकनाशक औषधी फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हताश आहेत. कृषी विभागाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन व रोग प्रतिबंधक औषधी उपलब्ध करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
.....
पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरा
नागपूर : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे मागील काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळीच उपचार होत नाही. उपचार न मिळाल्याने अनेकांकडील गुरे दगावतात. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
.....
खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
मौदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून मार्गात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजविण्यासाठी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
.....
घाणीमुळे नागरिकांत अंसतोष
सावनेर : स्थानिक शहरातील मुख्य ठिकाणी घाण पसरली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण होत आहे. अनेक वस्त्यात कचऱ्याचे ढिगारे साचले असतात. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नगरसेवक व प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी आहे.
......
भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त
निहारवाणी : ऐन हंगामाच्या काळात वीज वितरण कंपनीने भारनियमनाचा सपाटा सुरू केल्याने शेतकरी त्रस्त आहेत. रबी हंगामातील हरभरा, गहू, मिरची पिकांना ओलिताची गरज आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. थंडीच्या दिवसांत शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास ओलित करावे लागत आहे. दिवसा होणारे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.