नवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशाला प्लास्किटमुक्त करावे, प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि प्लास्टिक वापरावर निर्बंध घालणारा कायदा अजून कठोर व्हावा, अशी मागणी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली.येत्या आठवड्यात देशभरातील तज्ज्ञांची यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे यावेळी जावडेकर यांनी सांगितले.आदित्य ठाकरे यांच्यासमवेत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, शिवसेना गटनेते विनायक राऊत, राज्यसभा सदस्य अनिल देसाई, संयुक्त राष्ट्रसंघात पर्यावरण प्रश्नांवर विधायक काम करणारे एरिक, प्रदूषण रोखण्याची चळवळ उभारणारे अफरोज शाह यावेळी उपस्थित होते.
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा -आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 04:53 IST