IIM Sambalpur Placement: सहा राउंड पार करत मिळवली Microsoft मध्ये नोकरी; कंपनीने दिले तब्बल 65 लाखांचे पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:00 IST2023-03-30T14:59:36+5:302023-03-30T15:00:53+5:30
IIM Sambalpur Placement: विद्यार्थिनीने या यशाचे श्रेय प्राध्यापक आणि आई-वडिलांना दिले.

IIM Sambalpur Placement: सहा राउंड पार करत मिळवली Microsoft मध्ये नोकरी; कंपनीने दिले तब्बल 65 लाखांचे पॅकेज
जगातील मोठ्या कंपन्या IIT-IIM मध्ये शिकणाऱ्या विद्यार्त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचे पॅकेज ऑफर करतात. अशाच प्रकारचे पॅकेज जयपूरच्या एका तरुणाला मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी IIM संबलपूरमध्ये झालेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये तरुणीला सर्वाधिक 64.61 लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली. विद्यार्थिनीने या यशाचे श्रेय आयआयएम संबलपूरच्या प्राध्यापकांना आणि आई-वडिलांना दिले आहे.
अशी झाली निवड
जयपूर येथील अवनी मल्होत्राने तिच्या कॉलेज प्लेसमेंट दरम्यान मायक्रोसॉफ्टने घेतलेल्या मुलाखतीच्या 5-6 फेऱ्या यशस्वीपणे पार केल्या. तीचे व्यवस्थापन कौशल्य आणि इन्फोसिसमध्ये तीन वर्षे काम करण्याचा अनुभव याच्या आधारे मायक्रोसॉफ्टमध्ये तिची निवड करण्यात आली. तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक देखील उत्तीर्ण केले आहे आणि यामुळेच तिला मायक्रोसॉफ्टच्या मुलाखतीत यश मिळाले.
टॉप 10 विद्यार्थ्यांना 31.69 लाख रुपयांचे पॅकेज
IIM संबलपूरने आपल्या MBA (2021-2023) बॅचला भारतात वार्षिक 64.61 लाख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 64.15 लाख वार्षिक पॅकेजसह 100% प्लेसमेंट दिले आहे. येथे ऑफर केलेला सरासरी पगार 16.64 लाख रुपये आहे. बॅचच्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचे सरासरी पगार वार्षिक 31.69 लाख रुपये आहे. कॅम्पसमध्ये येणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, वेदांत, तोलाराम, अमूल, अदानी, EY, Accenture, Cognizant, Deloitte आणि Amazon इत्यादींचा समावेश आहे. जागतिक आर्थिक मंदी असतानाही एमबीएच्या उत्कृष्ट प्लेसमेंटबद्दल आयआयएम संबलपूरचे संचालक प्रा. महादेव जैस्वाल यांनी आनंद व्यक्त केला.