‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:35 IST2026-04-08T15:34:58+5:302026-04-08T15:35:26+5:30

Madhya Pradesh News: इंदूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय समभेदरम्यान वंदे मातरम  म्हणण्यावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षाती काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. तसेच दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

‘If your father has the guts, show him Vande Mataram from us’, Congress corporator challenges BJP, uproar in Indore Municipal Corporation | ‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ

‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ

इंदूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय समभेदरम्यान वंदे मातरम  म्हणण्यावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षाती काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. तसेच दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान वंदे मातरमवरून वादाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या मुस्लिम नगरसेविका रुबिना इक्बाला खान आणि फौजिया शेख अलीम यांनी वंदे मारतमचा अपमान केला, असा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला. त्यावरून बघता बघता सभागृहातील वातावरण तापले आणि दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये वादावादी सुरू झाली.

यादरम्यान, काँग्रेसच्या खासदार रुबिना इक्बाल खान यांनी एक वादग्रस्त विधान केलं. ‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम वदवून घ्या’, असं आव्हान भाजपाच्या नगरसेवकांना दिलं. त्यानंतर वाद आणखीच भडकला. भाजपाच्या नगरसेवकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच सभागृहामध्ये वंदे मातरमच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या सर्व घटनेचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सभापतींना हस्तक्षेप करावा लागला. वाढता गोंधळ आणि बेशिस्तपणा पाहून सभापतींनी काँग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेत्या आणि विद्यमान नगरसेविका फौजिया शेख यांना एका दिवसासाठी सभागृहातून निलंबित केले. तसेच इंदूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या विरोधाच्या मुद्यावरून भाजपाने काँग्रेसच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  

Web Title : कांग्रेस पार्षद ने भाजपा को 'वंदे मातरम' बुलवाने की चुनौती दी।

Web Summary : इंदौर नगर निगम के बजट सत्र में 'वंदे मातरम' पर हंगामा। कांग्रेस पार्षद रूबीना इकबाल खान ने भाजपा को चुनौती दी, जिससे और विरोध प्रदर्शन हुआ। एक पार्षद निलंबित।

Web Title : Congress corporator challenges BJP to make them say Vande Mataram.

Web Summary : Indore Municipal Corporation witnessed uproar over Vande Mataram during budget session. Congress corporator Rubina Iqbal Khan challenged BJP, sparking further protests. A corporator got suspended.