तुम्हाला परराष्ट्र धोरण समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचा"; पीएम नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 20:48 IST2025-02-04T20:46:16+5:302025-02-04T20:48:12+5:30
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली.

तुम्हाला परराष्ट्र धोरण समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचा"; पीएम नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीची यादी वाचून दिखवली. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी पीएम मोदींनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका केली. तसेच एक पुस्तक वाचण्याचा सल्लाही दिला.
खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल् टीकेवरुन पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधींवर निशाणा साधला. पीएम मोदी म्हणाले, आजकाल परराष्ट्र धोरणासारखे शब्द वापरणे ही एक फॅशन झाली आहे.
"दिवसातून दोनदा माझ्यावर खोटे आरोप"; अंजली दमानियांविरोधात धनंजय मुंडे उचलणार मोठं पाऊल
मंगळवारी लोकसभेत राहुल गांधींवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही लोकांना वाटते की ते परराष्ट्र धोरणावर बोलेपर्यंत परिपक्व दिसत नाहीत. त्यांना वाटते की परराष्ट्र धोरणाचा उल्लेख केला पाहिजे, जरी ते देशाचे नुकसान करत असले तरी. मी अशा लोकांना सांगू इच्छितो की, जर त्यांना खरोखरच परराष्ट्र धोरणात रस असेल आणि परराष्ट्र धोरण समजून घ्यायचे असेल आणि भविष्यात काहीतरी करायचे असेल तर त्यांनी नक्कीच एक पुस्तक वाचावे. यामुळे त्यांना काय आणि केव्हा बोलावे हे समजण्यास मदत होईल. त्या पुस्तकाचे नाव आहे JFK’s Forgotten Crisis।”.
नरेंद्र मोदींना निशाणा साधला
या पुस्तकात काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हणाले. पीएम मोदी म्हणाले, “हे पुस्तक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यात झालेल्या चर्चेचे तपशीलवार वर्णन करते. जेव्हा देश अनेक आव्हानांना तोंड देत होता, तेव्हा परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली कोणता खेळ सुरू होता हे या पुस्तकाद्वारे उघड केले जात आहे, म्हणून त्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे, असंही पीएम मोदी म्हणाले.
२०१५ मध्ये प्रकाशित झालेले 'जेएफकेज फॉरगॉटन क्रायसिस' हे ज्येष्ठ अमेरिकन राजकीय तज्ज्ञ ब्रूस रिडेल यांनी लिहिले होते. या पुस्तकात चीन-भारत युद्धात अमेरिकेचा सहभाग आणि तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या भारतातील वैयक्तिक स्वारस्याबद्दल काही माहिती दिली आहे.