शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

दहशतवाद्यांना रोखायचे असेल तर भारताने पाकिस्तानवर आक्रमण करावे- रामदेव बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 3:13 PM

भारताने हल्ला करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे.

पाटणा: सीमेवरील दहशतवादी कारवाया रोखायच्या असतील तर भारताने पाकिस्तानवर आक्रमण करायला पाहिजे, असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते रविवारी बिहारच्या गया येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिले जाते, ही बाब आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. त्यामुळे भारताने हल्ला करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे. दहशतवाद रोखण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तसेच भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यासाठी मदतही पुरविली पाहिजे. तेव्हाच पाकिस्तान ताळ्यावर येईल, असे रामदेव बाबांनी सांगितले. दरम्यान, कालच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली दिली होती.  आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीनं पाकिस्तानचे पितळ उघडे पडले होते. शरीफ यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद भारतात उमटले होते. यामुळे भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध घेतलेली भूमिका योग्यच होती, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडले होते. 

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPakistanपाकिस्तान