‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:47 IST2025-10-28T16:47:27+5:302025-10-28T16:47:57+5:30
Uttar Pradesh BJP News: त्यांनी आपल्या समाजातील २ मुली पळवल्या तर तुम्ही मुस्लिमांच्या १० जणीं घेऊन, असं विधान उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार राघवेंद्र सिंह यांनी केल्याने त्यावरून मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
त्यांनी आपल्या समाजातील २ मुली पळवल्या तर तुम्ही मुस्लिमांच्या १० जणीं घेऊन, असं विधान उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार राघवेंद्र सिंह यांनी केल्याने त्यावरून मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. येथील धनखरपूर गावात एका सभेला संबोधित करताना राघवेंद्र सिंह यांनी बदला घेण्याचं आवाहन करत एका विशिष्ट्य समाजाला उद्देशून हे विधान केले. तसेच या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन हिंदू मुलींना कथितपणे पळवून नेण्यात आल्याच्या आणि हिंदू मारले गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य केलं होतं, असं राघवेंद्र सिंह यांनी सांगितलं.
दोन हिंदू मुलींना कथितपणे पळवून नेण्यात आल्याची घटना घडल्यानंतर राघवेंद्र सिंह यांनी हे विधान केले आहे. याबाबत व्हायरल होत असेलल्या व्हिडीओमध्ये डुमरियागंजचे माजी आमदार राघवेंद्र सिंह हे प्रक्षोभक विधान करताना दिसत आहेत. आपल्या समाजाच्या दोन मुली त्यांनी नेल्या आहेत. तुम्ही मुस्लिमांच्या १० मुली घेऊन या. २ च्या बदल्यात १० पेक्षा कमी मान्य नाही. जे मुली घेऊन येतील त्यांच्या खाण्या-पिण्याची आणि नोकरीची व्यवस्था आम्ही करू. जे चाललंय ते आम्हाला मान्य नाही. याचा काही तरी मोठा बदला घेतला जाईल, ही बाब मुल्ला, मौलवींनी लक्षात ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडताना राघवेंद्र सिंह म्हणाले की, सांप्रदायिक सौहार्द जपण्याची जाबदारी केवळ हिंदूंचीच आहे का? ते अपमान करत राहतील आणि आपण सहन करत राहायचं, मुस्लिम लोक आमच्या मुली-सुनांना पळवून नेत असतील, हिंदूंना मारत असतील तर आपण सहन करत राहायचं का? त्यांनी सांगितलं की या घटनेनंतप मी लोकांप्रति सहानूभुती व्यक्त करून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी गेलो होतो, असेही त्यांनी ,सांगितले.