शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराला विरोध असेल, तर पाकमध्ये जा; शिया मुस्लीम नेत्याच्या उद्गारावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:36 IST

अयोध्येत राम मंदिर उभारण्यास ज्यांचा विरोध आहे, त्यांनी पाकिस्तानात वा बांग्लादेशात निघून जावे, असे धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वासिम रिझवी यांनी केले आहे.

फैजाबाद (उत्तर प्रदेश) : अयोध्येत राम मंदिर उभारण्यास ज्यांचा विरोध आहे, त्यांनी पाकिस्तानात वा बांग्लादेशात निघून जावे, असे धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वासिम रिझवी यांनी केले आहे.उत्तर प्रदेशातील शिया मुस्लिमांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यास याआधीच परवानगी दिली आहे. त्यांनी त्या जागेवरील आपला अधिकार सोडताना, संबंधित वादग्रस्त जागा शिया समुदायाची होती, त्यामुळे सुन्नी मुस्लिमांनी त्याबाबत काही बोलू नये, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिया समुदायाचे प्रतिनिधीत्व करणाºया रिझवी यांनी केलेल्या वक्तव्याला सुन्नी मुस्लीम फारसे महत्त्व द्यायला तयार नाहीत.बाबरी मशीद-राम मंदिर वादाची सुनावणी ६ फेब्रुवारीपासून कोर्टात सुरू होत आहे. त्याच्या तीन दिवस आधी मुस्लीम नेत्याने असे विधान करणे महत्त्वाचे मानले जात आहे. रिझवी शुक्रवारी राम जन्मभूमी न्यासाचे आचार्य सत्येंद्र दास यांच्या भेटीनंतर बोलत होते. ज्यांचा अयोध्येत राम मंदिर बांधण्यास विरोध आहे, ज्यांना त्या ठिकाणी पुन्हा मशीद बांधायची आहे वा जे लोक तशा पद्धतीने विचार करीत आहेत, त्यांनी खुशाल पाकिस्तान वा बांग्लादेशात जावे. त्यांना भारतात अजिबात स्थान नाही, असे रिझवी म्हणाले. मशिदीच्या नावावर जे जिहादची भाषा करीत आहेत, त्यांनी अबु बक्र अल बगदादीच्या इसिस संघटनेत सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)रिझवीना अटक करारिझवी यांच्या विधानाला शिया समाजाच्या धर्मगुरूंनी विरोध केला आहे. धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाºया रिझवींना अटकेची मागणी धर्मगुरूंनी केली आहे. शिया उलेमा कौन्सिलचे मौलाना इफ्तकार हुसैनी इन्कलाबी म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रिझवी यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्ता बळकावून विकण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :Templeमंदिर