२४ तासांत पार्सल मिळाले नाही तर पैसे मिळणार परत; स्पीड पोस्टची मुंबईसह ६ शहरांत ‘प्रीमियम सर्व्हिस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:36 IST2026-03-18T07:35:51+5:302026-03-18T07:36:08+5:30
पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा शहरांत ही सुविधा उपलब्ध असेल. मार्च २०२७ पर्यंत ही सेवा देशभर विस्तारणार आहे.

२४ तासांत पार्सल मिळाले नाही तर पैसे मिळणार परत; स्पीड पोस्टची मुंबईसह ६ शहरांत ‘प्रीमियम सर्व्हिस’
नवी दिल्ली : ठरलेल्या वेळेत स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास पोस्टाकडून ग्राहकांना ‘मनी बॅक गॅरंटी’ (पैसे परत) दिली जाणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या सेवांचा शुभारंभ करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा शहरांत ही सुविधा उपलब्ध असेल. मार्च २०२७ पर्यंत ही सेवा देशभर विस्तारणार आहे.
ग्राहकांना काय मिळणार?
२४ व ४८ तासांत हमखास डिलिव्हरी
विलंब झाल्यास ‘मनी-बॅक’ची हमी
ओटीपी-आधारित सुरक्षित वितरण
एंड-टू-एंड ट्रॅकिंग व रिअल-टाइम एसएमएस अलर्ट
मोठ्या ग्राहकांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’
एपीआय इंटिग्रेशन, केंद्रिकृत बिलिंग
मोठ्या शिपमेंटसाठी मोफत पिकअप