शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 17:02 IST

गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे, की या निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (West Bengal assembly election 2021).

ठळक मुद्देबंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात आपले भाष्य खोटे ठरले, तर आपण मला 2 मेरोजी माझ्या ट्विटची आठवण करून द्या - प्रशांत किशोरदेशात लोकशाही टिकवूण ठेवण्याच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्वच्या - प्रशांत किशोरप्रशांत किशोर यांनी गेल्या 21 डिसेंबरला एक ट्विट केले होते.

कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या आगामी निवडणुकांसदर्भात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant kishor) यांनी शनिवारी मोठे भाष्य केले. भाजपवर निशाणा साधत, तृणमूल काँग्रेसचे मुख्य स्लोगन 'बंगालला केवळ स्वतःचीच मुलगी हवी आहे'चा उल्लेख करत, बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात आपले भाष्य खोटे ठरले, तर आपण मला 2 मेरोजी माझ्या ट्विटची आठवण करून द्या, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. यावेळी ते, देशात लोकशाही टिकवूण ठेवण्याच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्वच्या ठरतील, असेही म्हणाले. (If proven wrong about election result in bengal hold me to my last tweet on 2nd may says Prashant kishor)

शरणार्थींच्या घरी भोजन अन् ममतांवर निशाणा; असा सुरू आहे अमित शाहंचा धडाकेबाज बंगाल दौरा, पाहा PHOTO

21 डिसेंबरला केले होते ट्विट -प्रशांत किशोर यांनी गेल्या 21 डिसेंबरला एक ट्विट केले होते. यावरूनच त्यांनी हे भाष्य केले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून 29 एप्रिलदरम्यान 8 टप्प्यांत विधानसभा निवडणुका होतील. तर मत मोजणी इतर चार राज्यांच्या मतमोजणीसोबतच 2 मेरोजी होईल.

ट्विटमध्ये केली अशी भविष्यवाणी - प्रशांत किशोर यांनी आपल्या 21 डिसेंबरच्या ट्विटमध्ये दावा केला होता, की बंगालमध्ये भाजपला 99 हून अधिक जागा मिळाल्या तर निवडणूक रणनीतीकार म्हणून सन्यास घेईल. याच ट्विटसंदर्भात प्रशांत यांनी भाष्य केले आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

बंगालची निवडणूक म्हणजे लोकशाही वाचविण्याची लढाई -टीएमसीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, की "देशात लोकशाही वाचविण्यासाठीची एक लढाई बंगालच्या निवडणुकीत होत आहे. बंगालच्या जनतेने या निवडणुकीसाठी मनोमन निश्चय करून ठेवला आहे आणि ते पुढील निवडणुकीत योग्य व्यक्तीच निवडतील." याच बरोबर, 'बंगालला केवळ स्वतःचीच मुलगी हवी आहे.' तसेच जर बंगाल निवडणुकीसंददर्भात माझे आकलन खोटे ठरले, तर मी ट्विटर सोडून देईन," असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांची कंपनी I-PAC या निवडणुकीत टीएमसीच्या रणनीतीवर काम करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. यानंतर ममत विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या कंपनीची मदत घेत आहेत..

तत्पूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे, की या निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक -पहिला टप्पा - 27 मार्च मतदानदुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदानतिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदानचौथा टप्पा - 10 एप्रिल मतदानपाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदानसहावा टप्पा- 26 एप्रिल मतदानसातवा टप्पा- 26 एप्रिल मतदानआठवा टप्पा- 29 एप्रिल मतदान 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाAmit Shahअमित शहा