"२०१२ मध्ये प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवलं असतं तर…’’, मणिशंकर अय्यर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 22:00 IST2024-12-15T21:59:57+5:302024-12-15T22:00:40+5:30

Mani Shankar Aiyar News: २०१२ मध्ये जेव्हा राष्ट्रपती निवडणूक होणार होती, तेव्हा यूपीए-२ सरकारचं नेतृत्व प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवून मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवलं गेलं पाहिजे होतं. तसं झालं असतं तर यूपीए सरकारमध्ये जी धोरणलकव्याची स्थिती निर्माण झाली होती, ती निर्माण झाली नसती.

If Pranab Mukherjee had been made Prime Minister in 2012...'', Mani Shankar Aiyar's big claim | "२०१२ मध्ये प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवलं असतं तर…’’, मणिशंकर अय्यर यांचा मोठा दावा

"२०१२ मध्ये प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवलं असतं तर…’’, मणिशंकर अय्यर यांचा मोठा दावा

आपल्या विधानांमुळे नेहमीच नवनव्या वादांना तोंड फोडणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  मणिशंकर अय्यर हे त्यांच्या एका नव्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यामुळे चर्चेत आहेत. मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या A Maverick in Politics पुस्तकामध्ये २०१२ मध्ये काँग्रेसमध्ये घडलेल्या घटनाक्रमाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या पुस्तकातील एका लेखामध्ये मणिशंकर अय्यर लिहितात की, २०१२ मध्ये जेव्हा राष्ट्रपती निवडणूक होणार होती, तेव्हा यूपीए-२ सरकारचं नेतृत्व प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवून मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवलं गेलं पाहिजे होतं. तसं झालं असतं तर यूपीए सरकारमध्ये जी धोरणलकव्याची स्थिती निर्माण झाली होती, ती निर्माण झाली नसती.

मणिशंकर अय्यर यांनी सांगितले की, मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी कायम ठेवण्याच्या आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनात पाठवण्याच्या निर्णयाने काँग्रेससाठी तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येण्याची कुठलीही शक्यता संपुष्टात आणली. दरम्यान, या पुस्तकात मणिशंकर अय्यर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमधील सुरुवातीचे दिवस, नरसिंह राव यांच्या सरकारचा काळ, यूपीए-१ सरकारमधील मंत्रिपदाचा कार्यकाळ आदी विषयांचाही उहापोह केला आहे.

मणिशंकर अय्यर आपल्या या पुस्तकात लिहितात की, २०१२ मध्ये मनमोहन सिंग यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते पुढे फिजिकली फिट होऊ शकले नाहीत. त्याचा त्यांच्या कार्यशैलीवर परिणाण झाला. तसेच त्याचं प्रतिबिंब सरकारच्या कार्यपद्धतीवर उमटलं. पक्षाचा विचार करायचा झाल्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी ह्या सुद्धा त्याच काळात आजारी पडल्या होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष दोघांमध्येही समन्वयाचा अभाव नव्हता, हेही लवकरच समोर आलं. तसेच तेव्हा पेटलेलं अण्णा हजारे यांचं आंदोलनही व्यवस्थितरीत्या हाताळलं गेलं नाही.

या पुस्तकात मणिशंकर यांनी प्रणव मुखर्जी यांनी सांगितलेल्या आठवणीचा एक किस्ता सांगत लिहिलं की, जेव्हा सोनिया गांधी ह्या कौशांबी येथील पर्वतात विश्रांतीसाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे डॉ. मनमोहमन सिंग यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडलं गेलं तर सोनिया गांधी ह्या आपली पंतप्रधानपदासाठी निवड करतील, असं सोनिया गांधी यांना वाटलं. मात्र अखेरीस मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी कायम ठेवत प्रणव मुखर्जी यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी समोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे काँग्रेससाठी यूपीए-३ सरकार स्थापन करण्याची शक्यता मावळली. 

Web Title: If Pranab Mukherjee had been made Prime Minister in 2012...'', Mani Shankar Aiyar's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.