If order comes from Modi & Shah, the Kamal Nath government will demolish it within 24 hours, claims MP BJP leader | वरून आदेश आला तर कमलनाथ सरकार 24 तासांत पाडू, भाजपा नेत्याचा दावा
वरून आदेश आला तर कमलनाथ सरकार 24 तासांत पाडू, भाजपा नेत्याचा दावा

नवी दिल्ली  - कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार पाडल्याने भाजपा नेत्यांना उत्साहाचे भरते आले आहे. दरम्यान, कर्नाटकनंतर थोडक्यात सत्ता हुकलेल्या मध्य प्रदेशकडे भाजपा नेत्यांनी आपली नजर वळवली आहे. आमच्या वरच्या फळीतील नंबर 1 आणि नंबर 2 वरील नेत्यांनी आदेश दिला तर  कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही, असा दावा मध्य प्रदेशमधील भाजपा नेत्याने केला आहे. 

मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी हा दावा केला आहे. आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत गोपाल भार्गव म्हणाले की, ''आमच्या वरच्या फळीतील नंबर 1 आणि आणि नंबर 2 क्रमांकावर असलेल्या नेत्यांनी आदेश दिला तर राज्यात सत्तेवर असलेले कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही.''  दरम्यान, गोपाल भार्गव यांनी भाजपामधील नंबर 1 आणि नंबर 2 क्रमांकावरील नेते असा उल्लेख करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे इशारा केला असून, मध्य प्रदेशमधील सरकारबाबत मोदी आणि शहा यांच्या मनात नेमकी काय रणनीती आहे, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. 


Web Title: If order comes from Modi & Shah, the Kamal Nath government will demolish it within 24 hours, claims MP BJP leader
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.