शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी तर Covaxin घेतली होती, त्यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी मिळाली?; कांग्रेसचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 12:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह. यादीत समाविष्ट नसलेली लस घेतल्यानंतरही परवानगी कशी दिली, काँग्रेसचा सवाल.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह.यादीत समाविष्ट नसलेली लस घेतल्यानंतरही परवानगी कशी दिली, काँग्रेसचा सवाल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी Covaxin या लसीचे दोन डोस घेतले होते. दरम्यान, आता ते अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदींना कोवॅक्सिनचा डोस दिल्यानंतरही अमेरिकेत प्रवेशाची परवानगी कशी देण्यात आली यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकेनं आपल्या लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश केलेला नाही. असं अताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना प्रवेश कसा देण्यात आला? असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. 

"मला जर योग्यरित्या लक्षात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Covaxin लसीचा डोस घेतला होता. याला अमेरिकेनं अद्याप मंजुरी दिलेली नाही. अथवा त्यांनी याशिवाय कोणती दुसरी लस घेतली आहे ज्याला अमेरिकनं प्रशासनानं सूट दिली आहे? देशााला हे जाणून घ्यायचं आहे," असं दिग्विजय सिंह म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर सवाल केले आहेत.  दिग्विजय सिंह यांच्याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा याचे सुपुत्र निखिल अल्वा यांनीदेखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "आपल्या पंतप्रधानांप्रमाणेच मीदेखील स्वदेशी कोवॅक्सिनचा डोस घेतला आहे. परंतु आता मी इराण, नेपाळ आणि काही अन्य देश सोडून जगाच्या बहुतांश भागात जाऊ शकत नाही. परंतु नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली हे जाणून घेऊन मी हैराण आहे. अमेरिकेनं अद्याप कोवॅक्सिनला मंजुरी दिली नाही. अशात त्यांनी कोणती लस घेतली हा प्रश्न उपस्थित होतो," असं ते म्हणाले.  १ मार्चला घेतली होती लसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिंबंधात्मक लस घेतली होती. त्यांनी स्वदेशी कोवॅक्सिन या लसीचा डोस घेतला होता. अद्याप कोवॅक्सिनला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह अनेक मोठ्या देशांनी मंजुरी दिलेली नाही. परंतु या देशांनी लसीच्या यादीत कोविशिल्डचा (Covishield) समावेश केला आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेस