"छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कलिमुद्दीन असतं…’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:02 IST2025-02-20T15:50:26+5:302025-02-20T16:02:50+5:30
Kailash Vijayvargiya News: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी शिवजयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कैलाश ऐवजी कलिमुद्दीन असतं, असं कैलाश विजयवर्गिय यांनी म्हटलं आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कलिमुद्दीन असतं…’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान चर्चेत
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी शिवजयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कैलाश ऐवजी कलिमुद्दीन असतं, असं कैलाश विजयवर्गिय यांनी म्हटलं आहे.
बुधवारी शिवजयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना कैलाश विजयवर्गिय यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे माळवा आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मुघलांना प्रवेश करता आला नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझं नाव कैलाश ऐवजी ‘कलिमुद्दीन’ असलं असतं, असा दावाही कैलाश विजयवर्गीय यांनी केला.
मंत्री कैलाश विजयवर्गीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाचं वर्णन करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहस आणि शौर्यामुळे भारताच्या अनेक भागात मुघलांची घुसखोरी थांबली. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच त्यांचे आदर्श जिवंत ठेवले पाहिजेत.