"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:39 IST2025-12-19T17:38:12+5:302025-12-19T17:39:54+5:30
दरम्यान, भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांचे समर्थन केले आहे. "नियुक्ती पत्र घेताना चेहरा दाखवू नये का? हा काही इस्लामिक देश नाही. नितीश कुमार यांनी पालकाची भूमिका बजावली," असे म्हणत, त्या महिलेने नोकरी सोडावी किंवा 'जहन्नुम'मध्ये जावे, असे वादग्रस्त विधान केले."

"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमादरम्यान एका मुस्लीम महिला डॉक्टरचा हिजाब खेचला. या घटनेनंतर, देशभरातून संताप व्यक्त होत आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत, नितीश कुमार यांनी संबंधित डॉक्टरची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री सचिवालयात आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे वाटली जात होती. यावेळी एका मुस्लीम महिला डॉक्टरला पत्र देताना नितीश कुमार यांनी तिचा हिजाब खेचून तो बाजूला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टरने सरकारी सेवेत रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले उमर अब्दुल्ला -
'एएनआय'शी बोलताना उमर अब्दुल्ला म्हणाले, "एक सेकंदासाठी सोडून द्या की, ती एक मुस्लीम महिला होती, हिजाब होता. केवळ एख्या महिलेवर हात उचलणे अथवा तिच्या कपड्याला स्पर्श करणे हे योग्य आहे का? आपण असे केले असते, मी तर केले नसते, तर मग त्यांना महिलेच्या कपड्याला स्पर्ष करण्याची काय आवश्यकता होती? यानंतर एखाद्या मुस्लीम महिलेचा हिजाब अशा पद्धतीने खेचणे.
उमर पुढे म्हणाले, आज मी वाचले की, ती महिला डॉक्टर आपली ऑर्डरच घेऊ इच्छित नाही. ती म्हणते की, आता ती नोकरीवरच रुजू होणार नाही. नीतीश कुमारांना आपल्या चुकीची जाणीव व्हायला हवी. त्या डॉक्टरला पुन्हा बोलावून तिची माफी मागायला हवी आणि ती नोकरी करेल यासाठी प्रयत्न करायला हवेत.
उमर अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा -
"एखाद्या महिलेच्या कपड्यांना हात लावणे किंवा त्यांच्या मर्जीविरुद्ध तो ओढणे हे कोणत्या संस्कृतीत बसते? जर हाच प्रकार राजस्थान किंवा हरियाणामध्ये एखाद्या हिंदू महिलेच्या घुंघटाबाबत झाला असता आणि तो एखाद्या मुस्लीम नेत्याने केला असता, तर भाजपने अशीच भूमिका घेतली असती का?"
दरम्यान, भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांचे समर्थन केले आहे. "नियुक्ती पत्र घेताना चेहरा दाखवू नये का? हा काही इस्लामिक देश नाही. नितीश कुमार यांनी पालकाची भूमिका बजावली," असे म्हणत, त्या महिलेने नोकरी सोडावी किंवा 'जहन्नुम'मध्ये जावे, असे वादग्रस्त विधान केले."
गिरीराज सिंह यांच्या विधानावर बोलताना अब्दुल्ला यांनी जोरदार टीका केली, "जर, असेच हरियाणा अथवा राजस्थानात एखाद्या हिंदू महिलेचे 'घूंघट' असते आणि ते मी खेचले असते तर, भाजप वाले असेच बोलले असते का? जर एख्याद्या मुस्लीम नेत्याने एखाद्या हिंदू महिलेचे 'घुंघट' खेचले असते, तर किती गदारोळ झाला असता. डॉक्टर महिला मुस्लीम होती, यामुळेच भाजपची प्रतिक्रिया वेगळी आहे," असे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.