मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स, IDFC फर्स्ट बँक घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:11 IST2026-02-26T16:11:14+5:302026-02-26T16:11:56+5:30

IDFC First Bank Fraud News :हरयाणामधील आयडीएफसी फर्स्ट बँकेमधील सरकारी खात्यांमध्ये झालेल्या तब्बल ५९० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात आणखी धक्कादाय बातमी समोर आली आहे.

IDFC First Bank Fraud News: Brother-in-law and sister trapped by brother-in-law, were fans of Harshad Mehta, shocking information comes to light in IDFC First Bank scam | मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स, IDFC फर्स्ट बँक घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर

मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स, IDFC फर्स्ट बँक घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर

हरयाणामधील आयडीएफसी फर्स्ट बँकेमधील सरकारी खात्यांमध्ये झालेल्या तब्बल ५९० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या अफरातफरी प्रकरणी एसीबीने चार आरोपींना अटक केली असून, कोर्टाने त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अभय याने त्याची बहीण स्वाती सिंगला आणि भावोजी अभिषेक सिंगला यांनाही कटात सहभागी करून घेतले होते. तसेच हे दोघेही शेअर बाजार घोटाळ्यातील आरोपी असलेल्या हर्षद मेहताचे चाहते होते, अशी माहिती समोर येत आहे.

या प्रकरणामध्ये रिषभ, अभय, अभिषेक सिंगला आणि स्वाती सिंगला या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी रिषभ हा आयडीएफसी बँकेमध्ये  मॅनेजर होता. तर अभय हा रिलेशनशिप मॅनेजर होता. दरम्यान, अभय याने बहीण स्वाती सिंगला आणि भावोजी अभिषेक सिंगला यांनाही या अफरातफरीच्या कटात सहभागी करून घेतले होते. स्वाती सिंगला आणि भावोजी अभिषेक सिंगला हे हर्षद मेहताला आपला आदर्श मानायचे. हर्षद मेहताने १९९२ मध्ये शेअर बाजारामध्ये तब्बल ५ हजार कोटींचा घोटाळा केला होता.

पोलिसांनी सांगितले की, रिषभ आणि ऋषी यांच्या सांगण्यावरून अभय कुमारने स्वाती सिंगला आणि अभिषेक सिंगला यांच्या नावाने बनावट कंपन्या सुरू केल्या. तसेच स्वाती सिंगला आणि तिचा पती अभिषेक सिंगला हे बिझनेस पार्टनर असल्याचे सांगत अनेक बनावट कंपन्या सुरू केल्या. स्वाती सिंगला आणि भावोजी अभिषेक सिंगला यांनी स्वास्तिक देश इंडिया फर्म या बनावट कंपनीच्या माध्यमातून सरकारी खात्यांमधून ३०० कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी १०० हून अधिक बँक खाती उघडली आणि नंतर ती बंद केली. या खात्यांमध्ये पैसे पाठवून ते काढण्यात आले. एसीबीचं पथक आता या प्रकरणी चंडीगड, मोहाली, पंचकूला आणि गुरुग्राममध्ये तपास करणार आहे. या अफरातफरीदरम्यान, ज्वेलर्स, बिल्डर्स, रियल इस्टेट, शेअर मार्केट आणि मद्यव्यावसायिकांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले, अशी माहितीही तपासामधून समोर आली आहे. 

Web Title : साले की वजह से जीजा और बहन फंसे, हर्षद मेहता के थे प्रशंसक

Web Summary : हरियाणा के IDFC फर्स्ट बैंक घोटाले में 590 करोड़ रुपये शामिल हैं। आरोपी अभय ने अपनी बहन और जीजा को फंसाया, दोनों हर्षद मेहता के प्रशंसक थे, और नकली कंपनियों का इस्तेमाल किया। उन्होंने स्वास्तिक देश इंडिया के माध्यम से 300 करोड़ रुपये का लेनदेन किया, जिसमें ज्वैलर्स शामिल थे।

Web Title : Brother-in-law, sister entangled due to relative in IDFC bank scam

Web Summary : Haryana's IDFC First Bank scam involved ₹590 crore. Accused Abhay implicated his sister and brother-in-law, both Harshad Mehta fans, using fake companies. They transacted ₹300 crore via Swastik Desh India, involving jewelers and others.