CoronaVirus : लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट - आयसीएमआर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 03:01 PM2021-07-16T15:01:25+5:302021-07-16T15:10:04+5:30

CoronaVirus : अभ्यासात एकूण 677 लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते.

ICMR study 80 percent of vaccinated Indians who got Covid 19 were infected by Delta variant | CoronaVirus : लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट - आयसीएमआर

CoronaVirus : लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट - आयसीएमआर

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी झाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. आयसीएमआरने अभ्यासात 677 लोकांचा समावेश केला. त्यापैकी केवळ 9.8 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी आयसीएमआरने हा अभ्यास केला.

अभ्यासात एकूण 677 लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते. 677 लोकांपैकी 592 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. यापैकी 527 जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली होती तर 63 जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. तर 85 लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला होता. ही माहिती 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून गोळा करण्यात आली होती.

या अभ्यासादरम्यान फक्त 9.8 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर 0.4 टक्के म्हणजेच 3 लोक दोन्ही डोस घेतल्यानंतरही मरण पावले. देशात दुसर्‍या लाटेत जास्तीत जास्त डेल्टा प्रकारामुळे लोकांना संसर्ग झाला. अभ्यासात सामील लोकांपैकी 384 लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. 86.69 टक्के म्हणजे 443 लोकांना डेल्टा, अल्फा, कप्पा, डेल्टा AY.1 आणि डेल्टा AY.2 ची लागण झाली होती. 

मोदी सरकारकडून मोठी ऑर्डर; 14 हजार कोटींमध्ये खरेदी करणार लसीचे 'इतके' डोस!
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. केंद्र सरकार लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14 हजार 505 कोटी रुपयांचे जवळपास 66 कोटी डोस खरेदी करणार आहे. यामुळे निश्चित देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल. तसेच, ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच देशाला लसींचे 66 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. या डोसमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातल्या 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आत्तापर्यंत एकूण 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.


 

'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा
भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लहर येण्याची भीती व्यक्त केली आहे. डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले.   

Read in English

Web Title: ICMR study 80 percent of vaccinated Indians who got Covid 19 were infected by Delta variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.