शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

IND vs AUS : इंदिरा गांधींचा जन्मदिवस म्हणूनच भारताने वर्ल्ड कप हरला; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 4:39 PM

himanta biswa sarma on wc final : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला.

India-Australia Final Match : भारताने वन डे विश्वचषक गमावल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला, ज्यावरून विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करत आहेत. खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवरून 'पनौती' म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. खरं तर पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान यांनी या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी हजेरी लावली होती. मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरू आहे.

विरोधक पंतप्रधान मोदींसह भाजपाला लक्ष्य करत असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक अजब विधान करून आपल्या पक्षाचा बचाव केला. तसेच त्यांनी भारताच्या पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडल्याचं दिसते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मदिवसाचा दाखला देत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, भारत हा सामना हरला कारण त्या दिवशी इंदिरा गांधींचा वाढदिवस होता.

यासोबतच त्यांनी बीसीसीआयला विनंती केली की, नेहरू-गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जन्मदिवस असेल त्या दिवशी भारताचे अंतिम सामने होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्यांशी विरोधी पक्षांची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 हिमंता बिस्वा सरमांचं टीकास्त्र अंतिम फेरीपर्यंतचे सर्व सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला अन् विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. याबद्दल बोलताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले, "आपण सर्व सामने जिंकलो आणि अंतिम फेरीत हरलो. मग आपण नक्की कशामुळे  सामना गमावला? तेव्हा मला दिसले की विश्वचषकाचा अंतिम सामना इंदिरा गांधींच्या जन्मदिवशी होता. इंदिरा गांधींच्या जन्मदिवशी भारताने विश्वचषक फायनल खेळली आणि देश हरला. त्यामुळे मी बीसीसीआयला विनंती करेन की कृपया गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जन्मदिवस असेल त्या दिवशी भारताचा सामना आयोजित करू नये. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातून मी तरी हे शिकलो आहे."

टॅग्स :ICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपAssamआसामIndira Gandhiइंदिरा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम